येथील एका व्यावसायिकाची पर्यटन क्षेत्रातील एका कंपनीने एक लाख १३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यावसायिकाने केरला हॉलीडेज इंडिया डॉट कॉम कंपनीचे मालक इब्राहिम शान यांच्याकडे गोवा हॉलिडे पॅकेजचे बुकिंग केले होते.  त्यासाठी त्यांनी एक लाख १३ हजार रुपये भरले होते. पंरतु गोव्यामध्ये हॉटेलचे बुकिंग केले नव्हते आणि विमान प्रवासाचे तिकीटही काढले नव्हते.  याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वृद्धेचे मंगळसूत्र खेचले

येथील ऋतुपार्क सोसायटीत राहणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातून चोरटय़ांनी सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना बुधवारी घडली. सकाळी आंबेघोसाळे तलाव परिसरात फेरफटका मारत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे मंगळसूत्र खेचून नेले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पादचाऱ्याचा अपघातात मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पुलाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या मंगेश सुरेश सरदार (१९) या पादचाऱ्याचा कोपरी पुलाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात श्रीधर देवराव आजगावकर (५९) या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.