News Flash

गुन्हे वृत्त : लाखांची चोरी

या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

घोडबंदर येथील पातलीपाडा भागात एका कारची काच फोडून चोरटय़ांनी दोन लाख ८६ हजारांचा ऐवज मंगळवारी चोरला.हिरानंदानी इस्टेटमध्ये रहाणारे सत्यप्रकाश पांडे यांच्या पातलीपाडा परिसरातील कारच्या पाठीमागील काच फोडून दोन बॅगा चोरून नेल्या. यामध्ये रोख रक्कम, डाटा कार्ड, मोबाईल फोन, लॅपटॉप व महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण २ लाख ८६ हजाराचा ऐवज होता. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

क्रेनखाली एकाचा मृत्यू

घोडबंदर भागात एका क्रेनच्या चाकाखाली सापडून दिनेश भारतीया (३३) या कामगाराचा मृत्यू झाला. १५ जून रोजी घोडबंदर येथील विजय सेल्ससमोरील रस्त्यावर काम सुरू होते.  त्यावेळी क्रेनचालकास दिशा दाखविण्याचे काम करीत असताना क्रेनच्या चाकाखाली सापडून दिनेश जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंगळवारी क्रेनचालक मैफुज खान याच्याविरोधात कापुरबावडी पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

१४ हजारांची फसवणूक

बँकेतून काढलेल्या रकमेमध्ये नकली नोटाही असू शकतात, अशी बतावणी करत एका भामटय़ाने तरुणाची १४ हजारांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी घडली. कॅम्प तीनमधील हरेकृष्णा सोसायटीमध्ये राहणारा २१ वर्षीय तरुणाने  बँकेतून त्याने ४० हजार रुपये काढले. त्याचवेळी एका भामटय़ाने त्याला गाठले. त्या भामटय़ाने तरुणाच्या हातातून पैसे घेऊन मोजले. हातचलाखीने त्यातील १४ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कैदी पळाला

उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या अतुल प्रकाश साळवे या कैद्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना मंगळवारी घडली. आधारवाडी कारागृहातील अतुल साळवे हा कैदी आजारी असल्यामुळे त्याला मंगळवारी उपचारासाठी उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पोलीस हवालदार पंडित सीताराम बोरगावकर हे त्याला रुग्णालयामध्ये एक्सरे काढण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी पंडित यांच्या हाताला झटका देऊन त्याने पलायन केले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मंगळसूत्र खेचले

रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी खेचून नेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दातिवली येथील शेकर गावात रहाणारी ३१ वर्षीय महिला पतीसह रिक्षाने उत्तरशीव येथून मंगळवारी सायंकाळी घरी जात होती. खर्डी गावातील गतिरोधकाजवळ रिक्षाचा वेग कमी होताच मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यावर जोरात थाप मारली आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:15 am

Web Title: thane crime 6
Next Stories
1 अभिनय करताना कधीही स्वत:ला विसरू नका
2 सृजनाची फॅक्टरी : अंतर्मुख करणारी ब्लॅक कॉमेडी
3 नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांनी जगणे शिकविले
Just Now!
X