News Flash

ठाण्यात ३८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त, आरोपी ताब्यात

ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ठाण्यात ३८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त, आरोपी ताब्यात
(संग्रहीत छायाचित्र)

ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आज मोठी कारवाई केली. या कारवाईत त्यांनी साधारण ३८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. त्याचबरोबर त्यांची तस्करी करणाऱ्या तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्येही दोन दिवसांपूर्वी एका रेव्ह पार्टीदरम्यान काही जण अंमली पदार्थांचं सेवन करताना आढळून आले होते. रविवारी मध्यरात्री मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटानजीकच्या बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मद्यधुंद अवस्थेतील २२ संशयितांना ताब्यात घेतले होते.


यामध्ये १२ महिला, १२ पुरूषांचा समावेश होता. स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या दोन बंगल्यात संशयित कोकेनसारखे अंमली पदार्थ, हुक्क्याचे सेवन करताना मद्यधुंद अवस्थेत आढळले होते. पार्टीसाठी अंमली पदार्थ उपलब्ध करणाऱ्या नायजेरियन नागरिकासह पार्टीच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा- रेव्ह पार्टीतील संशयितांना पोलीस कोठडी

दरम्यान, संशयितांमध्ये बिग बॉस या कार्यक्रमातील स्पर्धक हिना पांचाल हिच्यासह नृत्यदिग्दर्शिका, दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील काही युवती, एक विदेशी महिला अशा उच्चभ्रु वर्गाचा समावेश आहे. पीयूष शेट्टी या सहकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चरस, गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करण्यात आले. या प्रकरणात पांचाल हिच्यासह विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब, वरूण बाफना, कश्मिा, चांदणी भटीजा, श्रुती शेट्टी, शनया कौर, आषिता, शीना, प्रीती चौधरी, कौशिकी आदींवर कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला मुंबई एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं ताब्यात घेतलं होतं. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी एनसीबीनं ही कारवाई केली होती. गेल्या वर्षभरापासून मुंबईतील ड्रग्ज रॅकेट आणि त्यामागे असणाऱ्या अनेक मोठ्या नावांची चौकशी एनसीबीकडून करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 4:11 pm

Web Title: thane crime branchs anti narcotic cell has seized drugs worth approximately rs 38 lakhs vsk 98
Next Stories
1 महानगर क्षेत्राची पाण्याची मदार काळू धरणावरच
2 खासगी केंद्रांमध्ये लसीकरणाचा जोर
3 करोनाकाळातही आलिशान कारची विक्री जोरात
Just Now!
X