परदेशी नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका भामटय़ाने सहा तरुणांना सुमारे चार लाखांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. पश्चिमेतील ठाकूरवाडी येथील नवजोशी सोसायटीत राहणाऱ्या मनीष ठाकूर याने डोंबिवली पूर्वेत एचआर सव्‍‌र्हिसेसचे ऑफिस सुरू केले होते. युकेमधील एलआरएस कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने मनीष याने सूरज कुमार सुरेन सिंग मोईगंगर्थेम, धर्मेद्र अवस्थी, परिचय गौर, परमजित सिंग, जितेंद्र सिंग यांच्याकडून सुमारे चार लाख पंधरा हजार घेतले. हे पैसे त्याने त्याच्या खात्यावर भरण्यास सांगितले होते. त्यानुसार त्याने खात्यातून पैसे तर काढून घेतले; परंतु नोकरी लावली नाही. तरुणांनी त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सूरज याने डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सोनसाखळी चोरी

उल्हासनगर :

कॅम्प चारमध्ये शिवशक्ती कॉलनीमध्ये राहणाऱ्या ४७ वर्षीय महिला या शेजाऱ्यांसोबत मॉर्निग वॉकवरून घरी येत असताना दोघा चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. २६ फेब्रुवारी रोजी ही महिला घराशेजारी राहणाऱ्या मैत्रिणीसोबत मॉर्निग वॉकला गेली होती. नेताजी चौकातील गार्डनमध्ये जाऊन त्यांनी व्यायाम केला. व्यायाम झाल्यानंतर दोघी घरी परतत असताना ओ.टी. सेक्शन परिसरातील ब्रrो डॉक्टरांच्या क्लिनिकजवळ त्या आल्या. या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली.  विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.