05 March 2021

News Flash

सुरक्षारक्षक मारहाणप्रकरणी तीन अटकेत

कल्याण : मोहने येथील एनआरसी कंपनीमधील सुरक्षारक्षक गोपाळसिंग रावत यांना तीन जणांनी लोखंडी पाइपने मारहाण केली. कामावर असताना अशोक चव्हाण, सूर्यकांत माने, रूपेश चव्हाण यांनी

| August 14, 2015 02:34 am

पोलीसांनी एका आरोपीला अटक केली असून, अन्य सात जणांचा शोध सुरू आहे

कल्याण : मोहने येथील एनआरसी कंपनीमधील सुरक्षारक्षक गोपाळसिंग रावत यांना तीन जणांनी लोखंडी पाइपने मारहाण केली. कामावर असताना अशोक चव्हाण, सूर्यकांत माने, रूपेश चव्हाण यांनी त्यांना दमदाटी केली. ‘तुमच्यामुळे आमच्या मालकांच्या धंद्यावर परिणाम झाला आहे. आम्हाला अडविल्यास तुला पाहून घेऊ, अशी धमकी त्यांना दिली. यावेळी रावत यांनी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी रावत यांना मारहाण केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली.
चोर समजून वेटरला मारहाण
कल्याण : मोहने येथे राहणाऱ्या दुलारचंद कामत यांना चोर समजून एनआरसी कंपनीतील सुरक्षारक्षक राऊत आणि मुन्ना या दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. कामत हे वेटरचे काम करतात. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
डोंबिवलीत दागिन्यांची चोरी
डोंबिवली :  विष्णूनगर येथे राहणारी मंजुळा बोरीचंद या आनंदनगर परिसरातून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांचे मंगळसूत्र व सोनसाखळी चोरली. त्यांची किंमत १४ हजार रुपये आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 2:34 am

Web Title: thane crime story
Next Stories
1 जि. प. निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
2 धरणे अद्याप तहानलेलीच!
3 आम्ही चालवू हा पुढे वारसा..
Just Now!
X