५४८ पैकी ४७३ प्रकरणांवर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय
ठाणे जिल्ह्य़ातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची एकूण ५४८ प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यांपैकी ४७३ प्रकरणांची सुनावणी होऊन ती निकाली काढण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सोमवारी ठाण्यात दिली.
जिल्हा मानीव अभिहस्तांतरण समन्वय समितीची बैठक वंदना सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. मुद्रांक शुल्कसंबंधी ठाणे शहरातून ६९६ प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यापैकी ६२५ प्रकरणे निकाली निघाली असून ठाणे ग्रामीणमधील २८५ प्रकरणांपैकी २१५ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक दिलीप उडाण, सहजिल्हा निबंधक र. य. भोये, डी. एल. गंगावणे, नगरभूमापन अधिकारी रोहिणी सागरे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.