22 September 2020

News Flash

ठाणे जिल्ह्यात ६० लाख मतदार

जिल्हा प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ऐरोली विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या सर्वाधिक ४ लाख ३४ हजार ९३५ इतकी असून सर्वात कमी मतदार उल्हासनगर मतदारसंघात (२ लाख २१ हजार ८५०) आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर; ऐरोली विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदार

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण ६० लाख ९४ हजार ३०८ मतदारांची नोंद झाली आहे.

यामध्ये १८ ते २९ या वयोगटातील तरुण मतदारांचे प्रमाणे जेमतेम दहा टक्के अर्थात ९ लाख ४३ हजार इतके आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा ही संख्या वाढल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ऐरोली विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या सर्वाधिक ४ लाख ३४ हजार ९३५ इतकी असून सर्वात कमी मतदार उल्हासनगर मतदारसंघात (२ लाख २१ हजार ८५०) आहेत.

चाळीशीपार मतदारांची संख्या अधिकच

* १८ ते १९ वयोगटात एकूण ४३ हजार ७५८ मतदार आहेत.

*  २० ते २९ वयोगटात ८ लाख ९९ हजार ३५२ मतदार आहेत

*  ३० ते ३९ या मध्यम वयोगटात १४ लाख ७१ हजार २७९मतदार

*  ४० ते ४९ वयोगटात १५ लाख ६३ हजार २१०

*   ५० ते ५९ वयोगटात १० लाख ८५ हजार ४२६

*   ६० ते ६९ वयोगटात ६ लाख १३ हजार ६२९

*   ७० ते ७९ वयोगटात २ लाख ७३ हजार ६८३

*   ८०च्या पुढे १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत

मतदारसंघनिहाय संख्या

* ऐरोली ४,३४,९३५

*  मीरा भाईंदर ४,४२,२७९

*  कल्याण पश्चिम ४,२८,९१५

*  ओवळा माजिवाडा ४,२१,११८

*  कल्याण ग्रामीण ४,०३,०२०

*  मुरबाड ३,७८,५३०

*   बेलापूर ३,६८,५४३

*  मुंब्रा कळवा ३,२८,४५०

*  अंबरनाथ ३,०२,५४६

*  कल्याण पूर्व ३,३३,९७१

*  डोंबिवली ३,३८,२१७

*  कोपरी पाचपाखाडी ३,४२,७९३

*   ठाणे ३,१८,०६७

*   भिवंडी २,७९,३४०

*  शहापूर २,४४,०९०

*  भिवंडी पश्चिम २,६४,६७८

*  भिवंडी पूर्व २,६३,०६७

* उल्हासनगर २,२१,८५०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:13 am

Web Title: thane district has 60 lakh voters
Next Stories
1 लाचप्रकरणातील आरोपी अधिकाऱ्याचा पालिकेतील मार्ग मोकळा
2 बांगलादेशी महिलेला दहा वर्षे तुरुंगवास
3 कामकाजासाठी ‘झिरो नंबर’
Just Now!
X