News Flash

ठाण्यात बालिकेवर लैंगिक अत्याचार

राजकीय पक्षाच्या युवा पदाधिकाऱ्यास अटक

राजकीय पक्षाच्या युवा पदाधिकाऱ्यास अटक

किसननगर भागात एका साडेचार वर्षांच्या बालिकेवर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी शिवाजी धाडवे (२४) या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. धाडवे हा एका राजकीय पक्षाच्या युवक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे किसननगर परिसरात  तणावाचे वातावरण होते.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील किसननगर परिसरात पीडित बालिका राहते. धाडवे हा याच परिसरात राहतो. सोमवारी सायंकाळी पीडित मुलीची आई भाजी आणण्यासाठी बाजारात गेली होती. घरात पीडित बालिका आणि तिचा भाऊ असे दोघेच होते. घरातून निघताना तिच्या आईने दरवाजाला बाहेरून कडी लावली होती. शिवाजीने कडी उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बालिकेला पोटमाळ्यावर नेऊन धाडवेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

बालिकेच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर नागरिकांनी धाडवे याला चोप देत श्रीगनर पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

शिवाजी धाडवे हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असून तो युवक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे समजते. त्यामुळेच त्याच्या सुटकेसाठी संबंधित राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न होऊ शकतात, अशी भीती बालिकेच्या नातेवाईकांना आहे. यामुळे त्यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सोमवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:50 am

Web Title: thane girl raped
Next Stories
1 श्वान निर्बिजीकरण केंद्र गोत्यात
2 शहरबात : एसटी हरवतेय..
3 घरांच्या मंदीत सवलतींची संधी!
Just Now!
X