25 September 2020

News Flash

ठाण्याच्या महापौरांचा नेत्रदानाचा संकल्प

नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, पण जनमानसात याविषयी जनजागृती नसल्याने सहसा कुणी नेत्रदान करण्यासाठी पुढे येत नाही.

| June 13, 2015 01:02 am

नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, पण जनमानसात याविषयी जनजागृती नसल्याने सहसा कुणी नेत्रदान करण्यासाठी पुढे येत नाही. जर लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेतला तर नेत्रदानाविषयी जनजागृती होऊ शकते, हाच धडा ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी घालून दिला आहे. जागतिक दृष्टी दिनानिमित्ताने मरणोत्तर नेत्रदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे, तसेच नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना नवसंजीवनी मिळणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एखाद्या नेत्रहीन व्यक्तीला मरणोत्तर नेत्रदानामुळे पुन्हा दृष्टी मिळू शकते. परंतु नेत्रदानाकरिता नागरिक फारसे पुढे नसल्याने नेत्रदानाची कमतरता असून ही चिंतेची बाब आहे. यामुळे नेत्रदानाचे महत्व नागरिकांना व्हावे, यासाठी स्वत: मरणोत्तर नेत्रदान करणार असल्याची माहिती महापौर मोरे यांनी दिली.
नेत्रदानाचे महत्व पटवून देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच महापालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंध व्यक्तींना नवीन नेत्र बसवून त्यांना नवसंजीवनी देण्याचे तंत्रज्ञान प्रगत आहे. मात्र, नेत्रदात्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने आपण गरजूंना नवीन नेत्र बसवू शकत नाही. जर आपण मरणोत्तर नेत्रदान केले तर निश्चित गरजूंना त्याचा उपयोग होईल आणि त्यांना नवसंजीवनी देता येईल.  
  – संजय मोरे, महापौर, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 1:02 am

Web Title: thane mayor to donate eyes
टॅग Eye Donation
Next Stories
1 ठाण्यातील वीजपुरवठा आज बंद
2 मोठय़ा रुग्णालयांचे परवाना शुल्क दहा लाखांवर नेण्याचा प्रस्ताव
3 रस्त्यावर पार्किंग केल्यास दंड
Just Now!
X