28 January 2020

News Flash

रस्त्यावर खड्डे नसल्याचा ठाणे महापौरांचा दावा

ठाणे ३०वी महापौर वर्षां मॅरेथॉन १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वर्षां मॅरेथॉनच्या मार्गाची पाहणी; अनेक ठिकाणी डागडुजीची आवश्यकता

येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सोमवारी मॅरेथॉन मार्गाची पाहणी करून त्यावर खड्डे नसल्याचा दावा केला. असे असले तरी मॅरेथॉन मार्गावरील काही भागांमध्ये रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र पाहणी दौऱ्यादरम्यान दिसून आले. त्यामध्ये इंदिरानगर, कामगार चौक, कोरस रस्ता, देवदया नगर या भागांचा समावेश आहे.

ठाणे ३०वी महापौर वर्षां मॅरेथॉन १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. मॅरेथॉनच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गावर सोमवारी महापौर दौरा काढण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यामध्ये २१ कि.मी. स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली. ठाणे महापालिका भवनपासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नितीन जंक्शन येथून सेवारस्तामार्गे पुढे तीन हात नाका जंक्शनच्या दिशेने मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे. तीन हात नाका-मुलुंड चेकनाका-रोड क्रमांक २२ मार्गे इंदिरानगर भागातून स्पर्धेचा मार्ग जाणार आहे. मात्र या पाहणी दौऱ्यादरम्यान इंदिरानगर भागात खड्डे असल्याचे दिसून आले. इंदिरानगरहून पुढे यशोधननगरमार्गे वर्तकनगरच्या दिशेने मॅरेथॉन मार्गस्थ होणार आहे. पुढे वर्तकनगरहून देवदया नगरच्या दिशेने ही मॅरेथॉन जाणार आहे. देवदयानगर भागातही  खड्डे असल्याचे पाहायला मिळाले. देवदयानगरहून वसंत विहार मार्गे मानपाडय़ाच्या दिशेने मॅरेथॉन जाणार आहे. मानपाडा येथील सेवा रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सेवा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, या कामामुळे सेवा रस्त्याऐवजी महामार्गावरूनच मॅरेथॉन पुढे हिरानंदानी मेडोल्जच्या दिशेने जाणार आहे. त्यानंतर ब्रह्मांड नाक्यावरून वळसा घालून ही मॅरेथॉन पुन्हा महापालिका भवनच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पाहणी दौऱ्यामध्ये काही किरकोळ कामे आवश्यक असल्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. या कामांसाठी अहवाल सादर करण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात येणार आहे.

पाहणी दौऱ्यात स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेवक  नरेश मणेरा, नगरअभियंता रवींद्र खडताळे, उपआयुक्त अशोक बुरपुल्ले, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आणि उपअभियंता शैलेश चारी उपस्थित होते.

First Published on July 23, 2019 1:49 am

Web Title: thane mayors claim that there is no potholes on the road abn 97
Next Stories
1 आषाढातच भाज्या महाग
2 बोईसरचा उकिरडा
3 आणखी ३० रस्त्यांचे रुंदीकरण
Just Now!
X