News Flash

ठाणे : आमदार गीता जैन, अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांना करोनाची लागण

जैन होम क्वारंटाइन आहेत तर बोराडे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मिरा-भाईंदर : अपक्ष आमदार गीता जैन आणि अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांना करोनाची बाधा झाली आहे.

मिरा-भाईंदर शहरातील अपक्ष आमदार गीता जैन आणि अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांना करोनाची लागण झाली आहे. गीता जैन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. तर प्रकाश बोराडे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे पी. बी. जोशी रुग्णालयात दखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. आतापर्यंत ३,३२६ रुग्णांना करोनाची बाधा झाली असून १५३ रुग्णांचा बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार गीता जैन यांना करोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी स्वतःला घरीच अलगीकरण करून घेतले असून उपचार सुरु असल्याचे सांगितले. गीता जैन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना देखील घरीच अलगीकरण होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, २८ जूनला अग्निशमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सेक्टर ७ जवळील पी. बी. जोशी रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. प्रकाश बोराडे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आपण लवकरच करोनावर मात करून कामावर परतू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 8:43 pm

Web Title: thane mla geeta jain fire officer prakash borade infected with coronavirus aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कल्याण डोंबिवलीत करोनाचा कहर, ५६० नवे रुग्ण
2 Lockdown: ठाण्यात नाकाबंदी; पण अत्यावश्यक प्रवाशांना सूट – प्रशासन
3 टाळेबंदीआधी तोबा गर्दी!
Just Now!
X