अपसंपदा आढळल्यास आणखी गुन्हा

ठाणे : जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) खरेदीसाठीचे कंत्राट देण्याकरिता एका कंपनीकडून लाच घेताना अटक करण्यात आलेले ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना ठाणे न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे, डॉ. मुरुडकर यांची संपत्ती आणि बँक खात्यांची माहिती मिळवण्याचे काम सुरू असून त्यात गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर आणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

ठाणे महापालिकेतील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. या कंत्राटासाठी इच्छुक असलेल्या नवी मुंबईतील एका कंपनीला निविदा मंजूर करण्याच्या मोबदल्यात मुरुडकर यांनी १५ लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. याबाबत कंपनीच्या पदाधिकाऱ्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ९ एप्रिलला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. मुरुडकर यांना पाच लाख रुपये स्वीकारताना अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने मंगळवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. डॉ. मुरुडकर यांच्याविरोधातील पुढील चौकशीसाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ मिळावी यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना मंगळवारी पुन्हा ठाणे न्यायालयात हजर केले. मात्र, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात झालेली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आता त्यांची संपत्ती आणि बँक खात्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्वाची माहिती घेतल्यानंतर त्यांच्याकडे अपसंपदा आढळून आल्यास त्यांच्याविरोधात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

अन्य अधिकाऱ्यांचीही चौकशी

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह आरोग्य विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली. या चौकशीमध्ये निविदा भरण्यापासून ते निविदा मंजूर कशी केली जाते, याची प्रक्रिया पोलिसांनी जाणून घेतली. तसेच यानंतरही त्यांची चौकशी करायची असल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावले जाऊ शकते, असेही पोलिसांनी सांगितले.