पालिकेच्या पुढाकाराने देशातील पहिलाच प्रयत्न

भेटवस्तू किंवा सजावटीसाठी घरोघरी वापरात येणारा आणि नंतर कचऱ्यात जाणारा थर्माकोल वितळवून त्याचा पुनर्वापर करण्याचे पर्यावरणपूरक पाऊल ठाणे महानगरपालिकेने उचलले आहे. ठाणे महानगरपालिका आणि ‘श्री इन्स्युपॅक’ या कंपनीच्या वतीने सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात आतापर्यंत शहरातील पाच टन थर्माकोल वितळवण्यात आला आहे. घोडबंदर, मुंब्रा, माजिवडा परिसरातील गृहसंकुलांत आता ओल्या, सुक्या कचऱ्याप्रमाणेच थर्माकोलचेही वर्गीकरण करण्यात येत आहे. दिवसाला ५० किलो थर्माकोल वितळवण्यात येत आहे. आकर्षक वस्तू बनवण्यासाठी या थर्माकोलला लघुउद्योजकांकडून मागणी आहे. हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याचा पालिकेचा दावा आहे.

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
MNS, Mahayuti campaign, Pune, MNS pune,
पुण्यात मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार… पण मनसेच्या नेत्यांनी ठेवली ‘ही’ अट
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाठी विशेष आग्रह धरला होता. जमा होणाऱ्या थर्माकोलचे प्रमाण पाहून महापालिकेचे अधिकारीही अचंबित झाले आहेत. गृहसंकुलांत ई-कचरा, प्लॅस्टिक कचरा, उद्यानांतील कचरा याबरोबरच थर्माकोलचेही वर्गीकरण करण्यासंदर्भात पालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. वागळे इस्टेट परिसरात १५०० चौरस फुटांच्या जागेत थर्माकोलचे विघटन प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. घोडबंदर, माजिवडा येथील गृहसंकुलांतील रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ‘श्री इन्स्युपॅक’ या कंपनीचे मालक सौरभ कारखानीस यांनी सांगितले.

पुनर्वापराची प्रक्रिया

थर्माकोलसाठी गृहसंकुलांत पिशव्या वितरित करण्यात येतात. या संदर्भात संपर्क साधण्यासाठी ठाणे पालिकेने ८२९१७३५८९३ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक दिला आहे. थर्माकॉल जमा झाल्यावर सोसायटीतील प्रमुखांनी या क्रमांकावर कळवल्यास महापालिकेचे वाहन संबंधित गृहसंकुलात जाते. गोळा झालेला थर्माकॉल वागळे इस्टेट येथील प्रकल्प केंद्रात आणला जातो. विजेच्या साहाय्याने तो वितळवून लगदा लघुउद्योजकांना प्लास्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी वितरित केला जातो. या लगद्यापासून छायाचित्रांच्या फ्रेम, शोभेच्या वस्तू बनवण्यात येतात.

गृहसंकुलांना आवाहन करण्यात येत आहे. जनजागृती परिपत्रक वितरित केले आहे. व्यावसायिकही थर्माकोल घेण्यात येत आहे. या साठी ‘श्री इन्स्युपॅक कंपनी’कडून ३० लाख रुपये खर्च करण्यात आले असून महापालिकेने कंपनीला जागा उपलब्ध करून दिली आहे. यातील नफ्याचा काही वाटा महापालिकेला मिळणार आहे. त्यातून महसुलात भर पडणार आहे.

– मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, ठामपा