उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवणे कोणत्याही व्यवस्थेच्या प्रशासनाचे कामच असते. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाला आजवर हेच गणित जुळवता आलेले नाही. नियोजनाच्या अभावामुळे टीएमटीचे चाक खड्डय़ात रुतल्याचे चित्र आहे. यामुळे टीएमटीला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आयुक्त जयस्वाल यांच्यापुढे भविष्यातील मोठे आव्हान आहे. तसेच टीएमटी सक्षमीकरणासाठी उपक्रमातील उणिवा शोधून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र होते, पण आयुक्त जयस्वाल यांनी हे चित्र पालटून महापालिकेला पुन्हा आर्थिकदृष्टय़ा सक्षम केले आहे. यामुळे महापालिकेचा कारभार रुळावर आला आहे. त्याचप्रमाणे आता टीएमटीचा कारभार सुरळीत करण्यासाठी या व्यवस्थेला आधी आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचे आव्हान आयुक्त जयस्वाल यांच्यापुढे आहे.

ठाणे शहरातील वाहतूककोंडी भेदण्यासाठी आणि भविष्यातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने रस्तारुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. तत्कालीन आयुक्त टी चंद्रशेखर यांच्यानंतर म्हणजेच तब्बल वीस वर्षांनंतर ही मोहीम राबविण्याचे धाडस आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दाखविले आहे. रस्तारुंदीकरण जशी काळाजी गरज आहे, तशीच ठाण्यातील दळणवळण व्यवस्था ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. शहरातील मार्गावर पुरेशा टीएमटीच्या बस फेऱ्या होत नाहीत आणि रस्त्यामध्ये केव्हाही बस बंद पडेल, याचा नेम नाही. यामुळे दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली ही व्यवस्था जणू ठाणेकरांसाठी काळ्या पाण्याची शिक्षाच असल्याचे चित्र आहे. शहरवासीयांपुढे अंतर्गत वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा दुसरा पर्यायही उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मोठी कोंडी होताना दिसून येते. तसेच टीएमटीच्या सेवेविषयी ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असेच काहीसे ठाणेकरांचे मत तयार होऊ लागले आहे. एकीकडे ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी आयुक्त जयस्वाल अनेक नवनवे प्रकल्पांची आखणी करत असून त्यांनी आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. आर्थिक नियोजन बिघडल्यामुळे टीएमटीचे चाक खड्डय़ात रुतत चालले आहे. यामुळे महापालिकेप्रमाणेच टीएमटीला ‘बि’ घडवाना.. असेच आयुक्त जयस्वाल यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडावे लागले.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे सव्वातीनशेहून अधिक बसगाडय़ा आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात १९० बसेस रस्त्यावर धावत असून उर्वरित बसेस नदुरुस्त आहेत. या बसेस दुरुस्त करण्यासाठी पुरेशी साधनसामग्री टीएमटीकडे उपलब्ध नाही. महापालिकेतील पदधिकाऱ्यांनी आतापर्यंत काढलेल्या टीएमटी आगार पाहणी दौऱ्यातून ही बाब प्रत्येक वेळी प्रकर्षांने पुढे आली आहे. नटबोल्ट ते अगदी टायपर्यंतच्या साहित्याअभावी बसेस आगरात उभ्या आहेत. तसेच कामगारांच्या देणीची रक्कमही मोठी असून ती अद्याप कामगारांना देण्यात आलेली नाही. महापलिका दरवर्षी टीएमटीला अनुदानाच्या माध्यमातून निधी देते, मात्र आर्थिक नियोजनाअभावी टीएमटीला आता निधीही अपुरा पडू लागला असून नादुरुस्त बसेस आगारात उभ्या असल्यामुळे टीएमटीचे उत्पन्नही कमी झाले आहे. जमा-खर्चाचे गणित जुळविताना प्रशासनाला नाकीनऊ येत असल्याचे दिसून येते. यामुळे टीएमटीला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आयुक्त जयस्वाल यांच्यापुढे भविष्यातील मोठे आव्हान आहे. तसेच टीएमटी सक्षमीकरणासाठी उपक्रमातील उणिवा शोधून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र होते, पण आयुक्त जयस्वाल यांनी हे चित्र पालटून महापलिकेला पुन्हा आर्थिकदृष्टय़ा सक्षम केले आहे. यामुळे महापालिकेचा कारभार रुळावर आला आहे. त्याचप्रमाणे आता टीएमटीचा कारभार सुरळीत करण्यासाठी या व्यवस्थेला आधी आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचे आव्हान आयुक्त जयस्वाल यांच्यापुढे आहे.
दळणवळण सेवा नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते आणि ही सुविधा म्हणजे त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग असतो. रिक्षा सेवा खाजगी असल्यामुळे तिच्यात फारशी सुधारणा करणे शक्य नाही, पण त्यांच्या मुजोरीला लगाम घालण्याचे काम वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग करू शकतो. तशी या दोन्ही विभागांची जबाबदारी आहे आणि रिक्षाचालकांवर त्यांचा धाक असलाच पाहिजे. परंतु टीएमटीच्या बाबतीत काहीसे वेगळे आहे. ही बस सेवा म्हणजे ठाणे महापालिकेचा सार्वजनिक वाहतूक उपक्रम असून त्याच्या माध्यमातून शहरवासीयांना दर्जेदार सेवा पुरविणे बंधनकारक आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून टीएमटीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ठाणेकरांना दर्जेदार तर सोडाच पण पुरेशी दळणवळणाची सेवा मिळताना दिसून येत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी टीएमटीला सर्वच दृष्टीने सक्षम करण्याबरोबरच शहरातील सर्वच बस मार्गाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ठाणेकर प्रवाशांच्या सूचना मागवून त्याचाही विचार होणे गरजेचे आहे.

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

तरीही बसेस अपुऱ्याच..
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील १९० बसेस रस्त्यावर धावत आहेत. तसेच येत्या काही महिन्यांत टीएमटीच्या ताफ्यात १९० नवीन बसेस दाखल होणार आहेत. यामुळे टीएमटीच्या जवळपास ३८० बसेस ठाणेकरांना दळणवळणाची सेवा पुरविणार आहेत. नियमानुसार एक लाख लोकसंख्येला ३० बसेस असणे गरजेचे आहे. त्यामुळे ठाणे शहरातील लोकसंख्येचा विचार केला तर सुमारे २० लाखांच्या लोकसंख्येसाठी सुमारे सहाशे बसेसची आवश्यकता आहे. यामुळे येत्या काही महिन्यांपासून ३८० बसेस रस्त्यावर धावणार असल्या तरी लोकसंख्येच्या मानाने दोनशे बसेसची कमतरता भासणार आहे.

खासगी वाहतुकीचा आधार
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तिन्ही शहरांमधील नागरिकांपुढे टीएमटी आणि रिक्षा असे दोनच पर्याय आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत नियोजनाअभावी टीएमटी उपक्रमाचा बोजवारा उडल्याचे चित्र आहे. या सेवेविषयी शहरातील प्रवासी फारसे समाधानी नाहीत. यातूनच अनेक प्रवासी रिक्षा प्रवासाकडे वळले आहेत. प्रवाशांचा ओघ वाढल्याने रिक्षाचालकांचाही भाव वधारल्याचे चित्र आहे. तसेच रिक्षाचालकांची मुजोरी वाढू लागल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. या दोन्ही व्यवस्थेला कंटाळून प्रवाशांनी खाजगी बस वाहतुकीचा पर्याय निवडला, पण ही सेवा बेकायदेशीर असल्यामुळे खासगी बस वाहतुकीवर करवाई सुरू झाली. यामुळे ही सेवा आता जवळजवळ बंद पडल्याचे चित्र आहे.