दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून पसे घेऊन पळ काढणाऱ्या व्यक्तीला वाहतूक पालिसांनी पकडले. रफिक अमीन बॅरी (३४) असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड वरील मानपाडा परिसरात दिवाकर शाहू यांना रफिक याने शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गाठले. त्याने पसे दुप्पट करणार असल्याचे त्यांना सांगितले. शिवाय त्यांच्याकडून १५ हजार रुपये घेऊन पळ काढला. हा व्यक्ती तीन हातनाका इथे पोहचल्यावर तिथे कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांना ही बाब समजली. पोलिसांनी तातडीने कारवाई करताना बॅरी यास पकडले.