ठाणे : ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल झाले असून ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाच पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.

ठाणे नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांची महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, भिवंडी नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची खडकपाडा पोलीस ठाणे, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय सावंत यांची हिललाइन पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांची कळवा पोलीस ठाणे, तर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांची उल्हासनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे.

तर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांची भिवंडी नियंत्रण कक्षात, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांची विशेष शाखेत, हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांची वाहतूक शाखेत, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांची उल्हासनगर येथे बदली करण्यात आली आहे.