ठाण्यातल्या नौपाडा भागात असलेल्या बाजीप्रभू देशापांडे मार्गावर मनसेचे कार्यालय आहे. या कार्यलयासमोर शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. हे आंबे अशाप्रकारे ठेवणं अनधिकृत आहे, असा आक्षेप भाजपा कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर मनसेचे अविनाश पाटील त्या ठिकाणी आले आणि हिंमत असेल तर दुकानाला हात लावून दाखवा असं आव्हान अविनाश पाटील यांनी दिले. त्यानंतर पोलिसांनी अविनाश पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पोलिसांनी अविनाश पाटील यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या. ज्यानंतर भाजपा आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. ठाण्यातल्या बाजीप्रभू देशपांडे मार्गावर ही घटना घडली. भगवती शाळेजवळ मनसेचे कार्यालय आहे त्याच कार्यालयाबाहेर ही घटना घडली. या घटनेत भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांचा तुफान राडा ठाण्यात बघायला मिळाला. रात्री ९ ते ९. ३० च्या दरम्यान ही घटना घडली

हा पहा व्हिडिओ 

 

घडल्या प्रकारानंतर दुकानं बंद करण्यात आली असून या ठिकाणी गर्दी जमवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. इतकेच नाही तर पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्तही ठेवला आहे. घडलेल्या प्रकारामुळे सध्या तरी या भागात सामसूम आहे. आंबा विक्रीच्या किरकोळ मुद्द्यावरून सुरू झालेला वाद पेटला आणि भाजपा आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये चांगलेच भिडले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.