ठाण्यात शनिवार, रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

ठाणे : ग्राहकांना खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सातव्या पर्वाची रंगत वाढत असून या महोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे.

ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात शनिवारी आणि रविवारी जीवनगाणी निर्मित नृत्य आणि गाणी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या ठाणेकरांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि नवी मुंबई शहरातील ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ माध्यमातून उपलब्ध होते. दरवर्षी हा महोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडतो आणि महोत्सवाला नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळतो. या महोत्सवाच्या निमित्ताने ठाणे शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही असेच सांस्कृतिक आयोजित करण्यात आले असून शनिवार, १ आणि रविवार, २ फेब्रुवारी रोजी जीवनगाणी निर्मित नृत्य आणि गाणी या सांस्कृतिक     कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी जीवनगाणी निर्मित नृत्य आणि गाणी या कार्यक्रमात गायिका सायली कांबळी, गायक दिलीप गोलपकर आणि अमित राजे हे हिंदी आणि मराठी गाणी सादर करणार आहेत, तर रविवारी सायंकाळी गायिका अपर्णा नागरगट्टी आणि गायक दत्तात्रय मिस्त्री विविध चित्रपटांतील गीतांचे गायन करणार आहेत.

या दोन्ही दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ऋग्वेद बेंद्रे आणि ग्रुप विविध नृत्याविष्कार सादर करणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होऊन ठाणेकरांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा रविवार, १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून या महोत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत आहे. या भाग्यवान विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर, रेफ्रिजरेटर या वस्तूंसह गिफ्ट व्हाऊचर आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीज् अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा  रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स  हे या महोत्सवाचे असोसिएट पार्टनर आहेत. तर बंधन टुरिझम हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, अनंत हलवाई, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डीजी ठाणे हे महोत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तर या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरंन्ट हे फूड पार्टनर, परंपरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन फर्निचर हे कम्फर्ट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत, तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत.

कसे सहभागी व्हाल?

  •  पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  • सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयक दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.
  •  ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  •   अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळली जातील.
  •  ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.
  •  या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

 

कधी?

शनिवार, १ फेब्रुवारी आणि

रविवार, २ फेब्रुवारी,

वेळ – सायंकाळी ६.३० वाजता

कुठे?

चिंतामणी चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर, मासुंदा तलाव, ठाणे (प.)