07 March 2021

News Flash

विवियाना मॉलमध्ये ‘बीअर फेस्टिव्हल’

ऑगस्ट महिन्यातील आंतरराष्ट्रीय बीअर दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘द बीअर कॅफे’तर्फे आंतरराष्ट्रीय बीअर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

| August 14, 2015 01:19 am

ऑगस्ट महिन्यातील आंतरराष्ट्रीय बीअर दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘द बीअर कॅफे’तर्फे आंतरराष्ट्रीय बीअर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या बीअर फेस्टिव्हलमध्ये ठाणेकरांना देश-विदेशातील बडय़ा नामांकित बीअरची चव चाखता येणार आहे. यामध्ये ‘टकिला फ्लेवर’ असणारी अमिगो’ज ही इंग्लिश बीअर तर ‘असाही’ (जपानी), ‘पॉलेनर’ (जर्मन) आणि ‘सॅगरेस’ या पोर्तुगीज बीअरचा समावेश आहे. या चार विदेशी बीअर ग्राहकांना अवघ्या १८०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भारतीय नामांकित बीअरचा पर्यायही ‘द बीअर कॅफे’तर्फे ग्राहकांसाठी खुला करून देण्यात आला आहे. यामध्ये ‘बडवायझर’ आणि ‘हेनिकिन’ या बीअरचा समावेश आहे. बडवायझर बीअरच्या ४ पॉइंट आणि एक स्टार्टर घेतल्यास ग्राहकांना ८९९ रुपये तर हेनिकिन बीअरचे ४ पॉइंट घेतल्यास ग्राहकांना ११०० रुपये मोजावे लागणार आहेत.

कधी : ३१ ऑगस्टपर्यंत, वेळ : सकाळी १२ ते रात्री १२
कुठे : विवियाना मॉल, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ, ठाणे (प.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:19 am

Web Title: thane special 2
Next Stories
1 गणेशमूर्तीवर ‘बाहुबली’चाही प्रभाव
2 आठवणीतला पाऊस
3 झाडांची अभिवृद्धी
Just Now!
X