ठाणे जिल्हास्तरीय  ३५ व्या आनंद श्री २०१६ शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाणे शहरातील मावळी मंडळाने  सांघिक विजेतेपद पटाकविले तर स्फूर्ती व्यायमशाळेच्या स्वप्निल वायकर यांची किताब विजेता म्हणून निवड  करण्यात आली. डोंबिवली येथील समर्थ व्यायमशाळेच्या भूषण मेस्त्री याने सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शनाचा किताब पटकविला. या स्पर्धेत ४५ स्पर्धक सहभागी झाले होते. ठाणे येथील आनंद भारती या मैदानावर ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत छोटय़ा गटात विटाव्यातील बळीराम मोकाशी व्यायमशाळेतील हेमंत भंडारी यांनी प्रथम क्रमांक पटकविला.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Virat's Funny reaction Video Viral
MI vs RCB : विराट कोहलीने अचानक मैदानात आपले दोन्ही कान का पकडले? VIDEO होतोय व्हायरल
Virat Creates History at Chinnaswamy Stadium
RCB vs LSG : विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास! अनोखं शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

उंच गटात ठाण्यातील समल बिल्ड या व्यायमशाळेतील आसिफ काझी तर सुपरटॉल गटात समल बिल्ड व्यायमशाळेतीलच किरण धाकल यांनी प्रथम क्रमांक पटकविला आहे. विजेत्यांचे त्यांच्या प्रशिक्षकांनी कौतुक केले.

धावण्याच्या स्पर्धेत सानिकाला रौप्यपदक

प्रतिनिधी, ठाणे</strong>

गेल इंडिया स्पीड स्टार २०१६ स्पर्धेत अ‍ॅचीव्हर्स अकादमीच्या सानिका नाते हिने १०० मीटर धावण्याच्या १४ वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकाविले आहे. ही स्पर्धा ११ ते १२ मे रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली येथे पार पडली. या स्पर्धेत सानिकाने १३ मिनिटे ३९ सेकंदांत हे अंतर पार केले. सानिका ऐरोली येथील सेंट झेव्हीयर्स शाळेची विद्यार्थिनी असून तीन वर्षांपासून ती प्रशिक्षक नीलेश पातकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी ठाण्यातील महिलांची निवड

प्रतिनिधी,ठाणे

क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत जिल्हा कुस्तीगीर संघाच्या ठाणे शहर महिला विभागाची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राज्य अंजिक्यपद कुस्ती स्पर्धेत ठाणे शहर महिला संघाने दाखविलेल्या नैपुण्यामुळे त्यांची निवड झाली. या पहिली व दुसरी फेरी नाशिक व जालना येथे पार पडली होती.

या स्पर्धेत ठाणे शहरातील देवकी राजुपत हिने ६३ किलो वजनी गटांत सुवर्ण पदक पटकाविले असून राजश्री गायकवाड हिने ४८ किलो वजनी गटांत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. तसेच इतर वेगवेगळ्या स्पर्धेत संघाने यशस्वी कामगिरी केली आहे. या स्पर्धेची पुढील फेरी १९ ते २२ मे दरम्यान पंचवटी, नाशिक येथे आयोजित करण्यात आली असून ४८ वजनी गटात राजश्री गायकवाड, ५३ किलो वजनी गटात प्राजक्ता पानसरे, ५५ किलो वजनी गटात मोनाली साळुंके आदी महिला सहभागी होणार आहेत तर ५८ किलो वजनी गटात सरोज पवार, ६० किलो वजनी गटात आकोंक्षा वर्मा, ६३ किलो वजनी गटात देवकी राजपूत, ६९ किलो वजनी गटात अश्विनी वाघमारे आणि ७५ किलो वजनी गटात दिक्षा दिवे सहभागी होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे देण्यात आली.

ठाणे केंद्राचा जिनीत पसंद सामनावीर

प्रतिनिधी, ठाणे

दरेकर मैदान माटुंगा येथे झालेल्या सोळा वर्षांखालील एल.आय.सी. कल्पेश गोविंद कोळी आंतरक्रिकेट प्रशिक्षण केंद्र क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या साखळी सामन्यात ठाणे केंद्राच्या जिनीत पसंद याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. त्याने पहिल्या डावात डी.वाय.पाटील विरुद्ध ८ धावा देऊन ५ तर दुसऱ्या डावात ११ धावा देऊन ३ बळी घेतले. हा सामना ठाणे केंद्राने जिंकला.

मुंबई पोलीस सलग दुसऱ्या वर्षी ठाणे पोलीस ढाल स्पध्रेत अंजिक्य

प्रतिनिधी,ठाणे

ठाणे ग्रामीण पोलीस आयोजित दुसऱ्या ठाणे पोलीस ढाल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत मुंबई पोलिसांनी यजमान ठाणे ग्रामीण पोलिसांचा ५१ धावांनी पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी अंजिक्यपदाचा अशोक कामटे स्मृती ठाणे पोलीस ढालीवर आपले नाव कोरले. मुंबई पोलीस संघाने २० षटकांत ३ बाद १७४  धावा काढल्या तर ठाणे ग्रामीण पोलीस संघाने १९.५ षटकांत १२३ धावा काढल्या. मुंबई पोलीस संघाचा रोहन भोसले सर्वोत्तम फलंदाज तर ठाणे ग्रामीण संघाचा अनिल शिरसाट गोलंदाज ठरला.