27 February 2021

News Flash

खेळ मैदान : एकनाथ शिंदे क्रिकेट संघाला जेतेपद

प्रथम फलंदाजी करताना एकनाथ शिंदे क्रिकेट संघाने ४५ षटकांत ९ बाद २३० धावा केल्या.

ठाणे येथील सेन्ट्रल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तिसाव्या डॉ. श्रीधर देशपांडे वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट संघाने पदार्पणातच यजमान स्पोर्टिग क्लब कमिटी संघाचा तीन धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना एकनाथ शिंदे क्रिकेट संघाने ४५ षटकांत ९ बाद २३० धावा केल्या. सिद्धेश नातालकर याने ४२ तर संजय संसारे आणि हेमंत बुचडे यांनी अनुक्रमे ३० आणि २७ धावा केल्या. स्पोर्टिग क्लब कमिटी संघाच्या ओनिनदर गिल याने ७ षटकांत २४ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. स्पोर्टिग क्लब कमिटीने अतिशय सुरेख खेळ करत हा सामना अटीतटीचा केला. मात्र त्याला पराभवास सामोरे जावे लागले. त्यांना ४५ षटकांत ८ बाद २२७ करता आल्या. विशाल जैन याने ५१ धावा तर अर्जुन शेट्टी ४९ आणि ओनिन्दर गिल याने ४६ धावांची खेळी केली. एकनाथ शिंदे क्रिकेट संघाचा गोलंदाज विकास रेपाळे यांनी ८ षटकांत ३२ धावांच्या मोबदल्यात २ तर निखिल बागल याने ६ षटकांत १६ धावा देत २ गडी बाद केले.

अमोल मुजुमदार शनिवारी डोंबिवलीत

बॉइज क्रिकेट क्लबच्या उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप २८ मे रोजी स. वा. जोशी विद्यालयाच्या पटांगणावर संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी या शिबिराचे संयोजन केले होते. मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुजुमदार या वेळी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहेत. मागील तीस वर्षे डोंबिवली परिसरातून क्रिकेटपटू घडविणाऱ्या बॉइज क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी यंदा उत्तम कामगिरी केली आहे. मुंबईतील क्रिकेट स्पर्धेत १२, १६ आणि १९ वयोगटातील संघात बॉइज क्रिकेट क्लबचे विद्यार्थी चमकले, त्या गुणवान खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.

सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

जिल्हा हौशी सायकलिंग संघटना, मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटना आणि मुंबई उपनगर हौशी सायकलिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ५ जून रोजी तिरंगी प्रो स्टार्स बाइक्स मुंबई सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या प्रवेशिका २ जूनपर्यंत स्वीकारल्या जातील. सुमारे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेची पारितोषिके असणाऱ्या या स्पर्धेत अनुभवी आणि व्यावसायिक सायकलपटूंच्या रोड एलिट गटासाठी

५० किलोमीटरचे अंतर असणार आहे. याशिवाय १० आणि १६ वर्ष गटातही ही स्पर्धा पार पडेल. अधिक माहितीसाठी ८७६७७५९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कल्याणचा भावेश तर बदलापूरचा सिद्धांत पावरलिफ्टिंग स्पर्धेत अव्वल

उत्तर प्रदेशातील लखनऊ  येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणचा भावेश कोंडकर याने सुवर्णपदक तर बदलापूरच्या सिद्धांत कुडाळकर याने द्वितीय स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय स्तरावरील त्याच्या या कामगिरीने बदलापुरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होतो आहे.

उत्तर प्रदेशातील पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि इंडियन पॉवरलिफ्टिंग पाऊले चालती..असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लखनऊ  येथे नुकत्याच राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. त्यात  कल्याणचा भावेश कोंडकर याने सुवर्णपदक मिळवत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. याच स्पर्धेत बदलापूरच्या सिद्धांत कुडाळकर यांने ७४ किलो वजनी गटात ५१२ किलो वजन उचलत आपल्या गटात दुसरा येण्याचा मान मिळवला आहे. सिद्धांतच्या या कामगिरीवर त्याचे प्रशिक्षक आणि वडील नितीन कुडाळकर यांनी समाधान व्यक्त केले असून, कमी वयात त्याच्या कामगिरीवर खूष असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. या आधीही सिद्धांतने अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावले आहे.f

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:39 am

Web Title: thane sport event 5
Next Stories
1 पाऊले चालती.. : आहार, विहार आणि व्यायामाचा केंद्रबिंदू
2 कट्टय़ावरची गोलमेज : सिनेमा म्हणजे मनोरंजनच!
3 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनछंद अभिनयासाठी पूरक 
Just Now!
X