25 February 2021

News Flash

खेळ मैदान : क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचा समारोप

या वर्गामध्ये ३५ युवा क्रिकेट खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये दोन मुलीही सहभागी झाल्या होत्या.

ठाण्यातील आनंद भारती समाज आणि नवी मुंबईतील डॉ.डी.वाय पाटील क्रिकेट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वासंतिक क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचा  समारोप समारंभ नुकताच पार पडला. या  वर्गामध्ये ३५ युवा क्रिकेट खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये दोन मुलीही सहभागी झाल्या  होत्या.  गोविंद कोळी, घनश्याम नाखवा, रमाकांत कोळी व बरेश्वर मोरेकर यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या समारोप समारंभाच्या कार्यक्रमाला माजी रणजीपटू गोपाल नारायण कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

टेनिस क्रिकेट स्पर्धेत सावकार संघाचे वर्चस्व

संपूर्ण मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ासाठी आयोजित केलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत अंबरनाथच्या सावकार संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. मुंबईच्या सचिन इलेव्हन संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यात अंबरनाथच्या सावकार संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. ४ व ५ जून रोजी  अंबरनाथच्या गांवदेवी मैदानावर ही स्पर्धा पार पडली.

अंबरनाथचे माजी सभापती संदीप लकडे आणि सूर्यकांत चौघुले यांच्या पुढाकाराने ‘नाना चषक २०१६’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातून आलेल्या संघांमध्ये सामने खेळविण्यात आले. त्यातून मुंबईचा सचिन इलेव्हन संघ अंतिम स्पर्धेसाठी दाखल झाला. रविवारी अंबरनाथमधील संघाची स्पर्धा घेण्यात आली. त्यातून अंबरनाथमधील कोहोजगावचा सावकार संघ अंतिम सामन्यात दाखल झाला.

सचिन इलेव्हन आणि सावकार संघात झालेल्या चुरशीच्या सामन्यात सावकार संघाने सचिन संघाचा पराभव करीत विजेतेपद मिळविले. सचिन इलेव्हन संघाला उपविजेतेपद आणि खडे गोळवली संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजेत्यांना मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष कामा मांडले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

निधी सिंगला धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक

१३ व्या नॅशनल युथ अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशीपमध्ये धावण्याच्या स्पर्धेत ठाण्याच्या निधी सिंग हिने कांस्य पदक पटकाविले आहे. २६ ते २८ मे दरम्यान ही स्पर्धा कलिकत विद्यापीठाच्या मैदानावर पार पडली. निधी ही बारावी इयत्तेत शिकत असून सोमय्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. १८ वर्षांखालील मुलींमध्ये ५९.९७ सेकंदांत निधीने ४०० मीटर अंतर पार केले आहे. गेल्या वर्षांत खेळताना निधीला लागले होते. त्यानंतर ती पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर खेळली आणि कांस्यपदक मिळविल्याचे तिचे प्रशिक्षक नीलेश पातकर यांनी सांगितले.

किरण भोसले याला रौप्य पदक

१३ व्या नॅशनल युथ अ‍ॅथलेटीक चॅम्पियनशीपमध्ये धावण्याच्या स्पर्धेत ठाणे जिल्हयातील किरण भोसले याने रौप्य पदक पटकाविले आहे.२६ ते २८ मे दरम्यान ही स्पर्धा कलिकत विद्यापिठाच्या मैदानावर पार पडली. किरण याने  बारावीची परिक्षा दिली असून त्याने ८४ टक्के मिळविले आहेत. १८ वर्षांखालील मुलांमध्ये ११.१५सेकंदात किरणने १०० मीटर अंतर पार केले आहे. गेल्या वर्षांत किरण याने राष्ट्रीय पातळीवरील लांब उडी स्पर्धेतही बक्षिस मिळविले होते.किरण याने कांस्यपदक मिळविल्याने त्याचे प्रशिक्षक हेमकृष्ण बाहेकर यांनी कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:39 am

Web Title: thane sport events
Next Stories
1 पाऊले चालती.. : एकमेव मैदानात अतिक्रमण अन् अस्वच्छतेचा ‘खेळ’
2 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचन म्हणजे स्वत्वाचा शोध
3 सर्वधर्मीय स्मशानभूमी वादात
Just Now!
X