सायकल स्पर्धेत ओंकार जंगम, मानसी धुमाळे प्रथम
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे व तालुका क्रीडा संकुल समिती, अंबरनाथ आणि गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, बदलापूर आदींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत पुरुषांच्या गटात कल्याणचा ओंकार जंगम व महिलांच्या गटात मानसी धुमाळे यांनी प्रथम स्थान पटकावले. वयोगटांप्रमाणे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत डोंबिवली ते बदलापूपर्यंतचे सायकलपटू सहभागी झाले होते. दोन ते दहा किमीपर्यंत अंतर असणाऱ्या या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या सायकलपटूंना रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र तर चार ते सहा क्रमांकांवर आलेल्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उद्योजक कमलाकर घोरपडे, गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक समीर पिंपळकर, अंबरनाथ शारीरिक शिक्षण महासंघाचे आर. पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती आयोजक व अंबरनाथ तालुका क्रीडा केंद्र प्रमुख विलास गायकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धेतील विजेते सायकलपटू

पुरुष खुला गट (१० किमी)
प्रथम- ओंकार जंगम (कल्याण)
द्वितीय- दशरथ चोरगे (कल्याण)
तृतीय- ओंकार मोरे (कल्याण)

महिला खुला गट (५ किमी)
प्रथम- मानसी धुमाळे (बदलापूर)
द्वितीय- केतकी राऊत (बदलापूर)
तृतीय- जान्हवी दास (बदलापूर)

१७ वर्षांखालील मुले (५ किमी)
प्रथम- रोहन साखरे (डोंबिवली)
द्वितीय- सिद्धेश शिर्के (अंबरनाथ)
तृतीय- रोहित मोरे (अंबरनाथ)
१७ वर्षांखालील मुली (३ किमी)
प्रथम- श्रेया शेट्टी (बदलापूर)
द्वितीय- मधुरा गवळी (अंबरनाथ)
तृतीय- शकुंतला चौधरी (बदलापूर)

१४ वर्षांखालील मुले (२ किमी)
प्रथम- आयुष पडूर (अंबरनाथ)
द्वितीय- मिहीर विद्वंस (बदलापूर)
तृतीय- चिराग शेट्टी (बदलापूर)

१४ वर्षांखालील मुली (२ किमी)
प्रथम- पारमिता केदार (बदलापूर)
द्वितीय- भक्ती भिसे (बदलापूर)
तृतीय- फाल्गुनी डोळस (बदलापूर)

राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्समध्ये ठाण्याच्या तनिष्का शेट्टीला सुवर्ण रिले स्पर्धेत मुलांच्या संघालाही मिळाले सुवर्णपदक
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मैदानात महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या व नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या या १६ वर्षांखालील वयोगटाच्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुलींमध्ये लांब उडी प्रकारात ठाण्याच्या तनिष्का शेट्टीने ४.८५ मीटरवर लांब उडी मारत सुवर्णपदक संपादित केले असून तिला स्पर्धेतील उत्कृष्ट उडी मारणारी खेळाडू हा पुरस्कारही मिळाला आहे, तर रिले स्पर्धेत मुलांच्या संघाने सुवर्णपदक मिळवल्याने ठाण्याच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत दुहेरी सुवर्ण कामगिरी केली आहे.या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत एकूण ८५० स्पर्धक राज्यभरातून सहभागी झाले होते. यात ठाणे अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे ४१ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. भालाफेक स्पर्धेत ठाण्याच्या विशाल ओझा याने रौप्यपदक मिळवले, तर पेंटॅथलॉनमध्ये अब्दुल नाझीर याने २३८७ गुणांसह रौप्यपदक मिळवले. १०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत मेलोनी रॉड्रिग्झ हिने कांस्यपदक जिंकले. रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाच्या संघात प्रीत सुर्वे, शुभम पिसे, बिनी सैनी, निशान घाणेकर आदींचा समावेश होता, अशी माहिती ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane sports news
First published on: 03-09-2015 at 02:11 IST