आयपीएच प्रस्तुत ‘माइंड फेस्ट’ १३ ते १५ डिसेंबरदरम्यान  ‘लोकसत्ता’ सहप्रायोजक

वायू, भूमी, अग्नि, पाणी आणि आकाश या पंचमहाभूतांसोबत उपनिषदांची पुसटशी ओळख करून भारतीय पंपरेच्या अभिजात ठेव्यातील प्रतिकांचे दर्शन ‘माइंड फेस्ट’ या तीन दिवसीय महोत्सवाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून घडणार आहे.

‘लोकसत्ता’ सहप्रायोजक असलेल्या ‘आयपीएच’ प्रस्तुत ‘माइंड फेस्ट’ महोत्सव १३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणात होणार आहे.

‘माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं अर्थात वेदान्तविचार आणि व्यक्तिमत्व विकास’ या संकल्पनेवर आधारित ‘माइंड फेस्ट’ रंगणार आहे. सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.  ‘माइंड फेस्ट’ महोत्सवाचे यंदाचे दुसरे पर्व असून महोत्सवासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे.

मन आणि भावना यांच्याशी संबंधित विविध गोष्टींचा समावेश व्यासपीठावर करण्यात आला आहे. ‘पंचमहाभूत’ तत्वांची प्रतिकात्मक उभारणी व्यासपीठावर करण्यात येणार आहे.

यावेळी सायंकाळी बासरीद्वारे निर्मीत झालेला गंभीर असा श्री राग कार्यक्रमात सादर होणार आहे. तसेच कार्यक्रमात उपस्थितांना एकाग्रता, चिंतन आणि मनन करण्यास उत्तेजन देईल आणि मार्गदर्शनाचा अधिक रंजक अनुभव घेता येईल असे पाश्र्वसंगीत देखील तीन दिवसीय महोत्सवात असणार आहे. तीन दिवस पार पडणाऱ्या या महोत्सवात शांत्री मंत्र देखील ऐकण्यास मिळणार आहे. प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला आणि शेवटी हे शांतीमंत्र ऐकण्यास मिळणार असून डॉ. आनंद नाडकर्णी या मंत्रांचे विश्लेषण उपस्थितांना करणार आहेत. ज्ञान हे केवळ माहिती पुरतेच मर्यादित नसावे तर ज्ञान हे रंजनात्मक असावे. कोणतीही माहिती ही भाषण, प्रवचन न वाटता त्या ज्ञानात एक रंजक अनुभव असायला हवा. याच दृष्टीकोनातून ‘माइंड फेस्ट’ महोत्सवात या आगळ्यावेगळ्या व्यासपीठाची उभारणी करण्यात आली असून उपिस्थतांना माहिती सोबतच संवेदनांचा अनुभव देखील मिळणार असल्याचे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सांगितले. हे वैशिष्टय़पूर्ण व्यासपीठ नेपथ्यकार सचिन गांवकर यांच्या कलेतून साकारले जात असून राहुल तारी, ऋषिकेश पांचाळ, स्वप्निल कणसे, वैभव देवकर आणि वैभव कदम या विद्यार्थी कलाकारांची देखील साथ त्यांना मिळाली आहे.

आगाऊ नावनोंदणी आवश्यक  या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका ठाणे पश्चिम येथील आयपीएच बुक काऊंटर, श्री गणेश दर्शन, नववा मजला, तीन पेट्रोल पंपजवळ, एलबीएस मार्ग आणि मॅजेस्टिक बुक स्टॉल, राम मारूती रोड या ठिकाणी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८७०६०००७५, ८१०४४७०६३९

असा आहे कार्यक्रम

लोकसत्ता पॉवर्ड बाय असणाऱ्या यंदाच्या ‘माईंड फेस्ट’ महोत्सवाचे दुसरे पर्व शुक्रवार, १३ डिसेंबर, शनिवार, १४ डिसेंबर आणि रविवार, १५ डिसेंबर रोजी दररोज सायंकाळी सहा ते रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान ठाण्यातील गडकरी रंगायतन-समोरील समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणात रंगणार आहे. सुप्रसिध्द मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे याविषयावर उपस्थितांना महोत्सवाची संकल्पना असणाऱ्या ‘माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं अर्थात वेदान्तविचार आणि व्यक्तिमत्व विकास’ यावर दृकश्राव्य फितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.

नावनोंदणी आवश्यक

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका ठाणे पश्चिम येथील आयपीएच बुक काऊंटर, श्री गणेश दर्शन, नववा मजला, तीन पेट्रोल पंपजवळ, एलबीएस मार्ग आणि मॅजेस्टिक बुक स्टॉल, राम मारुती रोड या ठिकाणी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८७०६०००७५, ८१०४४७०६३९.यावर दृकश्राव्य फितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.