26 February 2021

News Flash

विकेण्ड विरंगुळा

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगावर प्रतिभेची मोहोर उमटवलेल्या कलाकारांमधील प्रमुख नाव म्हणजे मोहम्मद रफी. या महान गायकाला आदरांजली अर्पण करण्यासाठी ३० जुलै ते २ ऑगस्ट

| July 31, 2015 12:54 pm

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगावर प्रतिभेची मोहोर उमटवलेल्या कलाकारांमधील प्रमुख नाव म्हणजे मोहम्मद रफी. या महान गायकाला आदरांजली अर्पण करण्यासाठी ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ‘फिर रफी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे चार ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’ प्रस्तुत करत असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती जीवनगाणी संस्थेने केली आहे. ३१ जुलै हा त्यांचा स्मृतिदिन. या महान गायकाला आदरांजली वाहण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू असतात. मात्र गेली सहा वर्षे सुरू असलेला दिमाखदार व नेटक्या आयोजनाचा ‘फिर रफी’ हा कार्यक्रम आगळावेगळा ठरला आहे. मोहम्मद रफी यांच्या आवाजाची आठवण करून देणारा नव्या दमाचा गायक श्रीकांत नारायण या कार्यक्रमात रफी यांची सदाबहार ३० गाणी सादर करणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ३० जुलै रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात होईल. ३१ जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन, १ ऑगस्ट रोजी पार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, २ ऑगस्ट रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़गृह येथे पुढील कार्यक्रम होतील.
’कधी- शुक्रवार, ३१ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता
’कुठे- गडकरी रंगायतन, तलावपालीजवळ, ठाणे (प.)
यादें रफी
भारतीय शास्त्रीय संगीत, गझल, कव्वाली, ठुमरी, भजन, पाश्चात्त्य संगीत अशा विविध संगीत शैलींमध्ये आपल्या पाश्र्वगायनाने सर्व वयोगटातील श्रोत्यांना ज्या अवलियाने संगीताच्या प्रेमात पाडले असे पाश्र्वगायक म्हणजे मोहम्मद रफी. रफी आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या गाण्यांनी त्यांचे कार्य अजरामर करून ठेवले आहे. मोहम्मद रफी यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्त अल्फा साज और आवाज तर्फे यादें रफी या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. महेंद्र गोखले यांनी संगीत संयोजन केलेल्या या मैफलीत सुरेंद्र शेख, आदिल शेख, प्रकाश सोनटक्के आदी कलावंत रफी साहेबांची गाणी सादर करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहेत.
कधी : शुक्रवार, ३१ जुलै
कुठे : आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प.)
वेळ : रात्री ८.३० वाजता
‘हम है राही प्यार के’
सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांची ३५वी पुण्यतिथी आणि सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या ८६व्या जयंतीचे औचित्य साधून साज और आवाज द म्युझिकल फाऊंडेशन संस्थेतर्फे ‘हम है राही प्यार के’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या काही मोजक्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे आर.डी.बर्मन. आर.डी.बर्मन यांनी स्वरबद्ध केलेली अजरामर गाणी या मैफलीत सादर करण्यात येणार आहेत. डॉ. प्रशांत सुर्वणा, डॉ. मंदार आंजर्लेकर, डॉ. मंदार कोरान्न्ो, डॉ. शिल्पा मालंडकर आदी कलाकार मैफलीत सहभागी होणार आहेत. ’कधी : शुक्रवार, ३१ जुलै
’कुठे : सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर, डोंबिवली वेळ : रात्री ८.३० वाजता
किशोर फॉर किशोर- जिंदगी का सफर
गायक किशोर कुमार यांच्या ८६व्या जयंतीनिमित्त किशोर पवार अ‍ॅण्ड ग्रुप त्यांची सांगीतिक जीवन सफर घडवून आणणार आहेत. ठाणेकर रसिकांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणीच असेल. किशोर कुमार यांच्या स्मृती चाळवताना त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये किशोर फॉर किशोर- जिंदगी का सफर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व रसिकांनी आसन राखीव ठेवण्यासाठी किशोर पवार- ९५९४९३००२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कधी- रविवार, २ ऑगस्ट
कुठे- डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प.) वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
‘ऑल द बेस्ट-२’च्या कलाकारांशी गप्पा

‘ऑल द बेस्ट’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक वेगळा प्रयोग घडविला. मराठी चित्रपटसृष्टीला आघाडीचे नायकही या नाटकामुळे मिळाले. तिकीट बारीवर गल्ला जमविताना समीक्षकांची दाद मिळविणाऱ्या काही मोजक्या नाटय़कृतींमध्ये या नाटकाला मानाचे स्थान आहे. ‘लालीलिला’सारखे लक्षवेधी नाटक देऊनही देवेंद्र पेम आणि ‘ऑल द बेस्ट’ हेच समीकरण आजही अनेकांच्या लक्षात राहाते. पेम यांनी आता ऑल द बेस्ट-२ हे नवे नाटक रंगमंचावर आणले आहे. देवेंद्र पेम येत्या रविवारी ठाणेकरांच्या भेटीला येणार आहेत. अभिनय कट्टय़ातर्फे रविवारी ऑल द बेस्ट-२च्या चमूशी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
’कधी- रविवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता
’कुठे- जिजाऊ उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे (प.)
तीर्थ विठ्ठल..
सप्तसूर या संस्थेतर्फे ‘तीर्थ विठ्ठल’ या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह येथे शनिवारी, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सप्तसूर या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, मंजुषा पाटील आणि आनंद भाटे यांसारखे दर्जेदार कलाकार भक्तिसंगीताची पर्वणी घेऊन येणार आहेत.
कधी- १ ऑगस्ट, सायं. ७ वाजता
कुठे- डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, हिरानंदानी मेडोजजवळ, ठाणे (प.)
छत्रीवरील चित्रकला
पावसाळा आणि छत्री हे ठरलेले समीकरणच. पावसाळ्यात विविध रंगांनी नटलेल्या, विविध चित्र असलेल्या छत्र्या बाजारात पाहायला मिळतात. बाजारात सुंदर दिसणाऱ्या या छत्र्या जर आपल्याला प्रत्यक्षात साकारायला मिळाल्या तर त्याचा आनंद काही औरच असेल. हा आनंद प्रत्यक्ष आजमावायची संधी कल्याणकरांसमोर यंदा चालून आली आहे. कल्याणमधील अक्षरगंधा या संस्थेतर्फे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी छत्री रंगविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विविध चित्रे, अक्षरे, नक्षी यांनी छत्री सजवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
’कधी : रविवार, २ ऑगस्ट, वेळ : दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजता
’कुठे : बालक मंदिर शाळा, दत्त आळी, टिळक चौक, कल्याण (प.)

‘मी आणि
शाहीर साबळे’

लोककलेचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी कृष्णराव अर्थात दिवंगत शाहीर साबळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. विविध लोकनाटय़, प्रहसन, वग आदींच्या माध्यमातून लोककलेचे हे वैभव त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातून त्यांनी मराठी लोककला व परंपरा यांचे दर्शन महाराष्ट्रासह देशाला व जगालाही घडविले. याच कार्यक्रमातून त्यांनी तेव्हाच्या कलाकारांना संधी दिली आणि आज त्यापैकी काही रंगभूमीवरील ‘सेलिब्रेटी’ झाले आहेत. त्यापैकी काही जणांनी एकत्र येऊन ‘मी आणि शाहीर साबळे’ हा कार्यक्रम तयार केला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ३१ जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पहिला कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेते संतोष पवार आणि भरत जाधव हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
’कधी- शुक्रवार, ३१ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता
’कुठे- गडकरी रंगायतन, तलावपाळीजवळ, ठाणे (प.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 12:54 pm

Web Title: thane weekend
Next Stories
1 बदलापूर पालिकेची अभियंता पदे रिक्तच
2 धोकादायक इमारतींच्या विषयावर विशेष महासभेची मागणी
3 ठाण्यात आज वीज नाही
Just Now!
X