दीडशे वर्षांपूर्वी मुंबई स्थानकातून सुटलेली भारतातील पहिली लोकल ज्या ठाणे स्थानकापर्यंत धावली, त्याचे हे अगदी सुरुवातीच्या काळातील छायाचित्र. त्याकाळी ठाणे हेसुद्धा खाडी किनारी वसलेल्या छोटय़ा वस्त्यांचे एक बेट होते. त्यामुळे कौलारू छपराचे एखाद्या छोटय़ाशा चाळीइतकेच हे स्थानक होते. त्यावेळी प्रवाशांची संख्याही विरळ असायची.. आता काळानुरूप ठाणे शहर बदलले आणि त्याप्रमाणे स्थानकचे रूपडेही पालटत गेले. आज आज १६० वर्षांनंतर या स्थानकात तब्बल १० प्लॅटफॉर्म आहेत. दररोज एक हजाराहून अधिक लोकल ट्रेन या स्थानकातून धावतात आणि दररोज साडे सहा लाख प्रवासी ये-जा करतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 1:09 am