25 September 2020

News Flash

ठाणे.. काल, आज, उद्या

गेल्या दोन-तीन दशकांत ठाणे शहर आमूलाग्र बदलले असले तरी आताही ठाणे म्हटले की ज्या मोजक्या बाबी ठळकपणे आठवतात-त्यापैकी एक म्हणजे रेमंड कंपनी.

| March 3, 2015 12:12 pm

tv07
‘रेमंड’च्या आठवणी!
tv06गेल्या दोन-तीन दशकांत ठाणे शहर आमूलाग्र बदलले असले तरी आताही ठाणे म्हटले की ज्या मोजक्या बाबी ठळकपणे आठवतात-त्यापैकी एक म्हणजे रेमंड कंपनी. ठाणे शहरातील औद्योगिक विश्वात या कंपनीला खूपच महत्त्वाचे स्थान होते. साडेचार वर्षांपूर्वी ही कंपनी बंद पडली आणि हा औद्योगिक वारसा काळाच्या पडद्याआड गेला. ही कंपनी बंद पडल्यानंतर या कंपनीतील हजारो कामगारच नव्हे तर सर्व ठाणेकर हळहळले. आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जावी, असे सुतकी वातावरण शहरात होते. रेमंड कंपनीत नोकरी केलेली पिढी अजूनही त्या औद्योगिक सुवर्ण युगातील किस्से सांगते. ठाण्याच्या अवकाशातील रेमंडची धूर ओकणारी चिमणी आता भूतकाळात जमा झाली असली तरी ठाणेकरांच्या मनात रेमंड कायमच धडधडत राहिली आहे..(जुने छायाचित्र तब्बल ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९६५ मध्ये काढण्यात आले आहे) संग्राहक- सदाशिव टेटविलकर  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 12:12 pm

Web Title: thane yesterday today and tomorrow
Next Stories
1 अर्थसंकल्प तसा बरा.. पण धाडसी नाही!
2 दीड कोटींची कामे वादात!
3 भाषा अस्तित्वाशी जोडा
Just Now!
X