टिळकांचा वसा : नोकरदार मध्यमवर्गीयांचे शहर अशी ख्याती असलेल्या डोंबिवलीत १९५० मध्ये लोकमान्य टिळकांना अभिप्रेत उद्देश डोळ्यासमोर ठेवून काही समविचारी मंडळींनी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. केवळ गणेशोत्सव काळातच नव्हे तर वर्षभर मंडळ कला, क्रीडा, सांस्कृतिक असे विविध उपक्रम राबवीत असते. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाची सजावट साधीच असायची. मात्र सुवर्ण महोत्सवी वर्षांत स्थानिक रहिवासी असलेले सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी टिळकनगरच्या गणेशोत्सवाची जबाबदारी स्वीकारली. गेली १६ वर्षे ते येथे भव्य सजावट साकारत आहेत. (जुने छायाचित्र- मंडळाच्या संग्रहातून, नवे छायाचित्र- दीपक जोशी)