News Flash

कोपर पूल मेअखेपर्यंत वाहतुकीस खुला

डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलाच्या पूर्व भागातील पोहोच रस्त्यावर तुळई ठेवण्याचे काम सोमवारी सकाळी सुरू करण्यात आले

डोंबिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलाच्या पूर्व भागातील पोहोच रस्त्यावर तुळई ठेवण्याचे काम सोमवारी सकाळी सुरू करण्यात आले. पुलाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाल्यानंतर येत्या एक ते दीड महिन्यात म्हणजे मेअखेपर्यंत कोपर उड्डाण पुलावरून वाहतुकीला सुरुवात होईल, असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

एकूण २१ तुळया कोपर उड्डाण पुलाच्या पोहोच रस्त्यावर बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी सात तुळया बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. उर्वरित दोन टप्प्यांत त्या पुलावर ठेवून मेअखेपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात १५ मीटरच्या सात तुळया, दुसऱ्या टप्प्यात १२ मीटर, तिसऱ्या टप्प्यात १८ मीटरच्या तुळ्या पुलावर ठेवण्यात येणार आहेत. मागील दीड वर्षांपासून धोकादायक झाल्यामुळे कोपर उड्डाण पूल बंद आहे. पूर्व, पश्चिमेतील रहिवाशांना ठाकुर्ली पुलावरून वळसा घेऊन ये-जा करावी लागते. या पुलाचे काम कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यात आले नाही तर त्याचा फटका निवडणुकीत पालिकेतील सत्ताधारी म्हणून शिवसेनेला बसू शकतो. त्यामुळे सेनेच्या नेत्यांनी पालिका निवडणुकीपूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची घाई चालविली आहे. कोपर पुलाच्या रेल्वे मार्गावरील पश्चिमेतील पोहोच रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. पूर्व भागात सेवा रस्ते आणि पुलाच्या पद्धतीने पोहोच रस्त्याचे काम करायचे असल्याने या कामाला विलंब झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 4:07 pm

Web Title: the corner bridge is open to traffic until may akp 94
Next Stories
1 उल्हासनगरचा काटकसरीचा अर्थसंकल्प
2 कल्याण-डोंबिवली पालिकेला दररोज २५०० करोना लस कुप्यांची गरज
3 कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर ‘एलईडी’ दिव्यांचा प्रकाश
Just Now!
X