05 April 2020

News Flash

बंदुकीचा धाक दाखवून २ लाख लुटले

भाऊसाहेब खिलारे हे मंगळवारी रात्री ठाण्यावरून घोडबंदर दिशेकडे जात होते.

(सांकेतिक छायाचित्र)

घोडबंदर परिसरातून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करून २ लाख रुपयांची रक्कम लुटल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

भाऊसाहेब खिलारे हे मंगळवारी रात्री ठाण्यावरून घोडबंदर दिशेकडे जात होते. यावेळी काही भामटय़ांनी चार चाकीच्या आपघाताचा बहाणा करून भाऊसाहेब यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाऊसाहेब यांनी कार थांबवण्यास नकार दिल्याने सिनेवंडर मॉलजवळ आरोपींनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्यासोबत गाडीत बसलेल्या कुट्टी यांना मारहाण केली. तसेच भामटय़ांनी कुट्टी यांच्याकडे असलेली २ लाख रुपयांची रक्कम लुटून तेथून पळ काढला. याप्रकरणी भाऊसाहेब खिलारे यांनी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2019 3:03 am

Web Title: the gunman was robbed akp 94
Next Stories
1 ठाणे स्मार्ट सिटी कंपनीच्या सभेतही पडसाद
2 पुन्हा अटळहाल
3 सिग्नलची बाधा!
Just Now!
X