News Flash

वाडेघरला नवे परिवहन कार्यालय

सद्यस्थितीत कल्याण उपप्रादेशिक कार्यालयामार्फत वाहन नोंदणी तसेच इतर परवान्यांचे काम पाहीले जाते

संग्रहीत छायाचित्र.

कल्याण उपप्रादेशिकला नवा पर्याय; वाहतूक कोंडी कमी होणार

लोकसंख्या वाढीचे दरवर्षी नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरात वाहन नोंदणी तसेच विवीध प्रकारच्या परवान्यांची उपलब्धता सहजगत्या व्हावी आणि नागरिकांना अत्याधुनिक अशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने अखेर कल्याण उपप्रादेशिक कार्यालयासाठी वाडेघर भागात आठ हजार चौरस मीटरचा भुखंड मंजुर केला आहे. याठिकाणी वाहन परवाने मिळविण्यासाठी आवश्यक चाचण्या घेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून यामुळे कल्याण परिसरात सद्यस्थितीत होत असलेला वाहनांची कोंडी दुर होण्यास मदत होणार आहे. ठाणे परिवहन प्रादेशिक कार्यालयावरील भार वाढू लागल्याने काही वर्षांपुर्वी कल्याण तसेच नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभाग वेगवेगळे करण्यात आले. त्यानंतरच्या काळात पनवेल, उरणचा परिसरही नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागापासून वेगळा केला गेला. पण  या पट्टयातील लोकसंख्येचा वेग मोठा असून त्यामुळे वाहनांची मागणीही या भागात वाढू लागली आहे. एवढा मोठा भार पेलविणे ठाणे परिवहन कार्यालयास शक्य नसल्याने सरकारने गेल्या काही वर्षांपासून कार्यालयांच्या विक्रेंद्रीकरणाची भूमीका घेतली आहे.

सद्यस्थितीत कल्याण उपप्रादेशिक कार्यालयामार्फत वाहन नोंदणी तसेच इतर परवान्यांचे काम पाहीले जाते. याठिकाणी दररोज शेकडोंच्या संख्येने नागरिक विवीध कामांसाठी येतात. मात्र, याठिकाणी वाहन चाचणीसाठी पुरेशी जागा नाही. तसेच वाहन तपासणी आणि विवीध परवान्यांसाठी कार्यालयात येणारी वाहने रस्त्यांलगत उभी केली जात असल्यामुळे हा संपूर्ण परिसर येणाऱ्या वाहनांच्या कोंडीमुळे गजबजलेला असतो. ही कोंडी दुर व्हावी तसेच कार्यालयासाठी स्वतंत्र्य जागा उपलब्ध व्हावी यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव यापुर्वीच परिवहन विभागाने सादर केला होता. ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनीही या जागेच्या उपलब्धतेविषयी शासनाकडे सुधारित प्रस्ताव सादर केला होता. अखेर कल्याण तालुक्यातील वाडेघर परिसरातील आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक भुखंड सरकारने परिवहन कार्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत या कार्यालयाचे बांधकाम पुर्ण करावे, अशास्वरुपाच्या सूचनाही संबंधीताना दिल्या आहेत. या कार्यालयालगत सुसज्ज वाहनतळ, वाहन चाचणीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी सुविधा तळ उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहनचे प्रमुख नंदकिशोर नाईक यांनी ‘लोकसत्ता’ ठाणेला दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 2:43 am

Web Title: the new rto office in kalian
Next Stories
1 मुंब्रा खाडीला निर्माल्याचे ग्रहण
2 नातवंडांच्या भविष्यासाठी आजोबांची ‘मशागत’
3 चोरलेल्या दुचाकींची विक्री करून सामान्यांची फसवणूक
Just Now!
X