News Flash

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गार पाण्याची आंघोळ

आदिवासी विकास विभागाचा अनागोंदी कारभारामुळे शासनाचा कोटय़वधींचा निधी फुकट जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

११३ सौर हीटर बंद व नादुरुस्त अवस्थेत ; आरोग्याशी खेळ?

आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गतच्या आश्रमशाळांना काही वर्षांआधी दिलेल्या सोलर हीटर्स संचाची (सौर बंब) दुरुस्तीच होत नसल्याने या विद्यार्थ्यांना गार पाण्याने आंघोळी करावी लागत आहे. आदिवासी विकास विभागाचा अनागोंदी कारभारामुळे शासनाचा कोटय़वधींचा निधी फुकट जाणार आहे.

तत्कालीन आदिवासी आयुक्त कार्यालयामार्फत खरेदी केलेले लाखो रुपयांचे हे सोलर हीटर्स येथील आश्रमशाळांना सुमारे आठ वर्षांआधी पुरविण्यात आले होते. पालघर, डहाणू, तलासरी, वसई आदी तालुक्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ते देण्यात आले. सुमारे १२१ हीटर्सचा पुरवठा त्यावेळी झाला. उपलब्ध माहितीनुसार यातील ३० हीटर्स आस्थापितच झालेले नाहीत. त्यातील ८३ नैसर्गिक आपत्तीमुळे बंद, तर ३० अन्य कारणाने बंद आहेत. असे एकूण ११३ हीटर्स बंद व नादुरुस्त अवस्थेत आहेत.

हीटर्सचे संच पुरवठा केल्यानंतर ते बंद किंवा नादुरुस्त असतील तर त्याची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराने करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या संचाची मागणी नसतानाही ते पाठविले गेल्याचे कळते आहे. थंडी व पावसाळ्यात येथील हजारो विद्यार्थ्यांना त्यामुळे गार पाण्याने आंघोळी करावी लागत असल्याचे प्रकल्प कार्यालयास माहीत असतानाही यावर आजतागायत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही.

या पूर्वीचे पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जव्हार येथील आरोहण संस्थेच्या माध्यमातून या सोलर हीटरची दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र त्याला मोठा खर्च येत असल्याने ती किरकोळ दुरुस्ती करण्यात आली व पुन्हा त्यापैकी अनेक संच बंद पडले.

बंद संच

तवा : ४ संच

कळमदेवी :  ८ संच

भाताने : ४ संच

तलासरी : २ संच

धामणगाव : ४ संच

डोंगरी : ३ संच

सावणे : ५ संच

नंदोरे : ४ संच

नानिवली : ४ संच

गोवाडे : ४ संच

एम्बुर : ५ संच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 2:52 am

Web Title: the students of the ashram school have a cool water bath
Next Stories
1 उमरोळीत ‘यूटीएस’ तिकीट प्रणाली
2 सात मंडळांवर गुन्हे
3 पालिका उद्यानात बेकायदा वाहनतळ
Just Now!
X