28 September 2020

News Flash

औषध दुकानात चोरटय़ाकडून गोळीबार

ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली असून, त्याआधारे कळवा पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने शोध सुरू केला.

(संग्रहित छायाचित्र)

कळव्यातील घटना; कर्मचाऱ्याचा मृत्यू

कळवा येथील न्यू शिवाजीनगर परिसरातील औषध दुकानात शनिवारी पहाटे शिरलेल्या एका चोरटय़ाने दुकानात झोपलेल्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली.  त्यानंतर दुकानातून ८ हजार ६५० रुपये चोरून नेले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली असून, त्याआधारे कळवा पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने शोध सुरू केला.

प्रेमसिंग राजपुरोहित असे हत्या झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कळवा येथील न्यू शिवाजीनगर परिसरात रामसिंग राजपुरोहित यांचे वीर युवराज या नावाचे औषध दुकान आहे. या दुकानामध्ये त्यांचा भाचा प्रेमसिंग हा काम करीत होता. तो दुकानामध्येच झोपत असे. नेहमीप्रमाणे प्रेमसिंग हा शुक्रवारी रात्री दुकान बंद करून दुकानाच्या आत झोपला होता. दरम्यान शनिवारी

पहाटे चोरटय़ाने दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला. शटरचा आवाज ऐकून प्रेमसिंगला जाग आली आणि त्याने चोरटय़ाला पकडण्याचा प्रयत्न केला.  त्या वेळेस चोरटय़ाने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. यात प्रेमसिंगचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर चोरटय़ाने दुकानातून ८ हजार ६५० रुपये चोरून नेले. सकाळी दुकानात काम करणारी दुसरी व्यक्ती आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 1:49 am

Web Title: thieves shoot at drugstores abn 97
Next Stories
1 घोडबंदरमधील वाघबीळ खाडीत तरुणाचा मृतदेह
2 १२ तासात होणार २५ हजार वडे तळण्याचा विक्रम
3 वसईकरांचे पाणी अशुद्ध?
Just Now!
X