कापूरबावडी जंक्शन ते बाळकूम रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या तीन इमारती पाडण्याचे काम गुरुवारपासून सुरू करण्यात आले. कापूरबावडी नाक्यावरील महालक्ष्मी टॉवरमधील या तीन इमारती असून यानंतर या रस्ते रुंदीकरणाच्या कामास वेग येणार आहे. महाापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सकाळी या परिसरास भेट देऊन इमारती पाडण्याचे आदेश दिले. काही तासातच कारवाई सुरू करण्यात आली.
ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात निश्चित केल्यानुसार कापूरबावडी जंक्शन ते बाळकूम रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कापूरबावडी नाक्यावरील महालक्ष्मी टॉवरमधील तीन इमारती या कामात अडथळा ठरत होत्या. यापैकी तळ अधिक २ मजल्याची एक इमारत संपूर्णत: पाडण्यात आली तर उर्वरित २ तळ अधिक ४ मजली इमारती तोडण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या तीन इमारतींवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Construction supervisor murder,
कोंढव्यात बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून; इमारतीवरून फेकून दिले
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास