09 August 2020

News Flash

ठाण्यात तीन दिवस मनउत्कर्षांचा ज्ञानयज्ञ

‘लोकसत्ता’ सहप्रायोजक, आयपीएच प्रस्तुत ‘माइंड फेस्ट’; १३ ते १५ डिसेंबर

‘लोकसत्ता’ सहप्रायोजक, आयपीएच प्रस्तुत ‘माइंड फेस्ट’; १३ ते १५ डिसेंबर

ठाणे : ठाणेकरांसाठी भावनांवर आधारित हक्काचे कार्यक्रम घेऊन येणाऱ्या आयपीएचतर्फे ‘माइंड फेस्ट’ या तीनदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसत्ता पॉवर्ड बाय असणारा हा महोत्सव १३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणात पार पडणार आहे.

‘माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं अर्थात वेदान्तविचार आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या संकल्पनेवर आधारित ‘माइंड फेस्ट’ महोत्सव रंगणार आहे. सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये गेली तीस वर्षे कार्यरत असलेल्या, इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ अर्थात ‘आयपीएच’च्या विद्यमाने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘माइंड फेस्ट’ महोत्सवाचे यंदाचे दुसरे पर्व आहे. ‘आयपीएच’तर्फे संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या वेध महोत्सवाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ‘माइंड फेस्ट’ महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एक वर्ष वेध आणि एक वर्ष माइंड फेस्ट महोत्सव संस्थेकडून ठाण्यात आयोजित करण्यात येऊ  लागला.

लोकसत्ता पॉवर्ड बाय असणाऱ्या यंदाच्या ‘माइंड फेस्ट’ महोत्सवाचे दुसरे पर्व शुक्रवार १३ डिसेंबर, शनिवार १४ डिसेंबर आणि रविवार, १५ डिसेंबर रोजी दररोज सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान रंगणार आहे. सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे उपस्थितांना महोत्सवाची संकल्पना असणाऱ्या ‘माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं अर्थात वेदान्तविचार आणि व्यक्तिमत्त्व विकास’ यावर दृक्श्राव्य फितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.

वेदान्त तत्त्वज्ञानाचा गाभा हा सर्वसमावेशक, मानवतावाद आणि मनोविकासाला प्राधान्य देणारा असून त्यातील वैचारिक, भावनिक मांडणीचा मेळ उत्क्रांतिजन्य मानसशास्त्राशी (इव्होल्युशनरी सायकॉलॉजी) घालता येतो अशी मांडणी करणाऱ्या निरूपणाचे सादरीकरण तीन सायंकाळी आणि एकूण अकरा तास डॉ. आनंद नाडकर्णी करणार आहेत.

मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान यामधील मधला धागा असणाऱ्या मेंदूविज्ञान यावर डॉ. आनंद नाडकर्णी निरूपण करणार आहेत. निरोगी आत्मस्वीकार, उत्कृष्टतेचा ध्यास, नातेसंबंधातील स्नेहबंध वाढवणे, सामाजिक बांधिलकी, व्यक्तिविकास ते विश्वविकास असा सूत्रांचा परामर्श घेतानाच ईश्वरसंकल्पना, पूजा-कर्मकांडे, जन्म-पुनर्जन्म या विषयांवरही वेदान्तावर आधारित विवेकनिष्ठ मांडणी डॉ. आनंद नाडकर्णी उपस्थितांना या तीनदिवसीय महोत्सवात करणार आहेत.

पूर्व नावनोंदणी आवश्यक

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका ठाणे पश्चिम येथील आयपीएच बुक काऊंटर, श्री गणेशदर्शन, नववा मजला, तीन पेट्रोल पंपजवळ, एलबीएस मार्ग आणि मॅजेस्टिक बुक स्टॉल, राम मारुती रोड या ठिकाणी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८७०६०००७५, ८१०४४७०६३९.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 1:58 am

Web Title: three day mind fest festival in thane zws 70
Next Stories
1 कौटुंबिक प्रोत्साहनामुळे यश
2 महामार्गावर ‘धूळके’
3 ‘लोकांकिका’ची आज ठाण्यात पहिली घंटा!
Just Now!
X