22 September 2019

News Flash

खारेगाव टोलनाका अपघात तिघे जखमी

घटनेत रिक्षामधील वाहनचालकासह तीन प्रवाशांना दुखापत झाली आहे.

कळवा येथील खारेगाव टोलनाक्याजवळ रिक्षा आणि कारचे नियंत्रण सुटल्याने ही दोन्ही वाहने सुमारे १२ फूट खोल खड्डय़ात पडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत रिक्षामधील वाहनचालकासह तीन प्रवाशांना दुखापत झाली आहे. जखमींमध्ये एका तीन वर्षीय मुलाचाही समावेश आहे. या तिघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विवेक सोढे (३२), ममता सोढे (२६) आणि दिगना सोढे (३) अशी जखमींची नावे असून हे तिघे एकाच कुटुंबातील आहेत. मंगळवारी विवेक हे त्यांच्या रिक्षातून ममता आणि दिगना यांना घेऊन खारेगाव टोलनाक्याच्या विरुद्ध दिशेने जात होते. त्याच वेळेस कारचालक अनिल रोचानी हे या मार्गावरून कार घेऊन आले असता त्यांना समोरून येणारी रिक्षा दिसली नाही. त्या वेळी या दोन्ही वाहनांचे नियंत्रण सुटून ही वाहने रस्त्याकडेला असलेल्या १० ते १२ फूट खोल खड्डय़ात जाऊन पडली. या घटनेत रिक्षामधील विवेक, ममता आणि दिगना या तिघांना दुखापत झाली.मात्र, याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

First Published on September 11, 2019 2:05 am

Web Title: three injured in tolanaka accident akp 94