06 December 2019

News Flash

डोंबिवली: मुलांना शाळेत सोडायला जाताना अपघात, आई-वडील आणि मुलीचा मृत्यू

एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, पाच वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला

डोंबिवलीत अपघात

डोंबिवलीमध्ये झालेल्या एका विचित्र अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या दुचाकीस्वाराला डम्परने धडक दिली. या अपघातामध्ये आई, वडील आणि मुलगी जागीच ठार झाली तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीमधील खंबाळपाडा येथे सकाळी ही दूर्घटना घडली. गणेश चौधरी हे पत्नी उर्मिलाबरोबर दुचाकीवरुन आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये गणेश, उर्मिला आणि चार वर्षीय हंसिकाचा जागीच मृत्यू झाला. तर हंसिकाचा पाच वर्षीय भाऊ देवांश हा या अपघातामधून थोडक्यात बचावला. चौधरी कुटुंबिय दुचाकीवरुन कल्याणहून डोंबिवलीच्या दिशेने निघाले होते. कल कल्याण शीळ रस्त्यावरुन टाटा पॉवरकडे वळण घेत असताना खांबाळपाडा भागात त्यांची दुचाकी आली तेव्हा रस्त्याच्या लागून असणाऱ्या एका गेटमधून ट्रक वेगाने बाहेर येत होता. ट्रकचा वेग बघून त्याला रस्ता मोकळा करुन देण्यासाठी चौधरी यांनी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या दुचाकीचे हॅण्डल ट्रकच्या चाकाला घासलं गेलं आणि गाडीवरील चौघांपैकी तिघेजण ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. ट्रक चालकाला काही समजण्याआधीच ट्रकचे मागचे चाक गणेश, उर्मिला आणि हंसिकाच्या अंगावरुन गेले. त्यामुळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर देवांश बाहेरच्या बाजूला फेकला गेल्याने बचावला. याप्रकरणामध्ये पोलिस अधिक तपास करत आहेत.

कल्याणमध्ये आज सकाळी झालेल्या दुसऱ्या एका अपघातामध्ये दुचाकीने धडक  दिल्याने प्रभाकर ठोके या व्यक्तीचा मृत्यू झाला. प्रभाकर हे डीएनसी शाळेमध्ये सह शिक्षक म्हणून कार्यरत होते.

First Published on December 3, 2019 12:56 pm

Web Title: three members of a family dies as truck ramps two wheeler at dombivli scsg 91
Just Now!
X