News Flash

वीज तारेच्या स्पर्शाने शहापुरात तिघांचा मृत्यू

दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

तुटलेल्या वीजवाहक तारांना स्पर्श झाल्याने बालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजता शहापूर तालुक्यातील डोळखांबजवळील गांडुळवाड आणि मोहाचीवाडी या गावांदरम्यान घडली.

दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. महावितरण कंपनीने दोषींची चौकशी करणार असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी अडीच लाखांची मदत जाहीर केली आहे. नामदेव हेमा गांगड (५५) कान्ही आंबो धुपारी (५३) आणि मनोज किसन धुपारी (४) असे मृतांची नावे आहेत. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी या वेळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 1:01 am

Web Title: three peoples dead due to electric shock
टॅग : Electric Shock
Next Stories
1 बिबटय़ाच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
2 सत्तेसाठी युद्धही घडवतील!
3 दुष्काळ जाहीर नाही, मग कर कसा?
Just Now!
X