03 December 2020

News Flash

शहापूरमध्ये तीन तरुणांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही

घटनेचा पोलीस तपास सुरु, गावकऱ्यांमध्ये विविध चर्चा

शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील चांदा गावातील मामा भाचे व शहापूर येथील एका विवाहित तरुणाने जंगलात जाऊन एका झाडाला तिघांनी साडीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले  नसून  गावकरी या आत्महत्येच्या घटनेबाबत उलटसुलट चर्चा करीत आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी भेट देऊन पहाणी करून मृतांच्या नातेवाईकाचे सांत्वनही केले.

१४ नोव्हेंबरपासून नितिन भेरे  (रा. शहापूर),  महेंद्र दुभेले (रा.चांदा ३०, खर्डी) व मुकेश घायवट ( रा. चांदा २२, खर्डी) हे तिघे घरुन बेपत्ता झाले होते. याबाबत सर्वत्र तपास करून त्यांचा शोध न लगल्याने त्यांच्या नातेवाईकांनी १७ नोव्हेंबर रोजी शहापूर व खर्डी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. आज शुक्रवारी  चांदा गावातील रूपेश सापळे या गुराख्याला गुरे चारत असताना एका झाडाला तीन लटकलेले मृतदेह दिसून आल्याने त्याने खर्डी पोलिसांना कळवले. त्यानंतर हे मृतदेह नितीन भेरे, महेंद्र दुभेले आणि मुकेश घायवट यांचेच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 7:28 pm

Web Title: three youths commit suicide in shahapur scj 81
Next Stories
1 मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरर्यंत राहणार बंद
2 दंड भरा, अन्यथा वाहन जप्त
3 रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी केडीएमटीची सेवा
Just Now!
X