पालिकेच्या आरोग्य विभागाच्या घोडचुकीमुळे वाद

ठाणे : महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घराजवळच मोफत आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत सुरू केलेला आपला दवाखाना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आरोग्य विभागाच्या घोडचुकीमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील २५ ठिकाणी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दोन कंपन्यांनी एकत्रित कंपनी स्थापन करून या कामाचे कंत्राट घेतले होते. असे असताना आरोग्य विभागाने यापैकी एका कंपनीला परस्पर कामाचा कार्यादेश देऊ केल्याने या निर्णयाविरोधात भागीदार असलेल्या दुसऱ्या कंपनीने महापालिकेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे हा प्रकल्प वादात सापडला आहे.

canara bank declared may 15 as the record date for the stock split scheme
कॅनरा बँकेकडून ‘समभाग विभागणी’ पात्रतेसाठी १५ मे रेकॉर्ड तारीख घोषित
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Assistant police officers son succeeds in UPSC examination
पिंपरी : सहायक फौजदाराच्या मुलाची ‘यूपीएससी’ परीक्षेत यशाला गवसणी
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यापैकी ५२ टक्के नागरिक हे झोपडी आणि चाळीमध्ये राहत आहेत. आरोग्य निकषांनुसार प्रत्येक ३० ते ४० हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असणे आवश्यक असताना ठाण्यात एक ते दीड लाख लोकसंख्येचा भार एका आरोग्य केंद्रावर पडतो. ठाण्यातील विद्यमान २७ आरोग्य केंद्रांवरील ताण कमी करण्यासाठी महापालिकेने शहरात ५० ठिकाणी आपला दवाखाना उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अशा नामकरणाने सुरू झालेल्या या दवाखान्याची व्यवस्था सांभाळणाऱ्या ‘मेडऑनगोस आपला दवाखाना’ संस्थेला प्रत्येक रुग्णामागे दीडशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दीड वर्षांपूर्वी शहरात पाच ठिकाणी दवाखाने सुरू करण्यात आले. त्यानंतर हा उपक्रम काहीसा थंडावला. याच काळात ठाणे रेल्वे स्थानकात ‘वन रूपी क्लिनिक’ सुविधा सुरू झाली. ‘आपला दवाखाना’च्या ठेकेदाराने ‘वन रूपी क्लिनिक’ संस्थेशी दोन महिन्यांपूर्वी भागीदारी करून दवाखाने चालवण्याचे निश्चित केले. त्यानंतर या संस्थेने दवाखाना उभारणीचा खर्च, त्या ठिकाणी लागणारी उपकरणे, साहित्य आणि जागा भाडय़ाने घेणे, असा खर्च करून दोन महिन्यांत २५ दवाखाने सुरू केले. या दवाखान्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज सरासरी ७० रुग्णांवर येथे मोफत उपचार केले जातात. असे असताना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या चुकीमुळे ही व्यवस्थाच बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

या उपक्रमाच्या कामाचा ठेका ‘मेडऑनगो आपला दवाखाना’ या कंपनीला मिळाला होता. ही कंपनी ‘मेडऑनगो’ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आणि इंद्रायणी कन्स्ट्रक्शन या दोन्ही कंपन्यांनी एकत्रित येऊन स्थापन केली होती. असे असतानाही महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी ‘मेडऑनगो आपला दवाखाना’ या कंपनीऐवजी मेडऑनगो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे कार्यादेश दिला. त्याआधारे मेडऑनगो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेल्वे स्थानकांमध्ये वन रूपी क्लिनिक चालविणाऱ्या संस्थेला उपक्रमात भागीदार करून घेतले. याबाबत इंद्रायणी कन्स्ट्रक्शन कंपनीने पालिकेला नोटीस बजावल्यानंतर हा प्रकार वन रूपी क्लिनिक संस्थेच्या निदर्शनास आला. ही चूक लक्षात येताच पालिकेने कामाचे पैसे रोखून धरले. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या वन रूपी क्लिनिक संस्थेने उपक्रमातून बाहेर पडण्याचा विचार सुरू केला आहे.यासंदर्भात पालिकेचे डॉ. राजू मुरुडकर यांच्याशी संपर्क साधला असता ‘माहिती घेऊन कळवतो’ असे सांगत त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

या दोन्ही कंपन्यांच्या वादाबाबत यापूर्वी काहीच कल्पना नव्हती. तसेच लोकोपयोगी उपक्रम असल्यामुळे आम्ही अजूनही तो राबवीत आहोत. या वादात तोडगा निघाला नाही तर, आर्थिक अडचणीमुळे हा उपक्रम बंद करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

डॉ. राहुल घुले, संचालक, वन रूपी क्लिनिक