21 September 2020

News Flash

पालिकेच्या तिजोरीला मालमत्ता कराचा आधार

महिनाभरात ४० कोटी रुपयांची मिळकत

संग्रहित छायाचित्र

महिनाभरात ४० कोटी रुपयांची मिळकत

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामामुळे गेल्या चार महिन्यांपासून रखडलेल्या मालमत्ता कराची वसुली करण्यावर महापालिका प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून भर दिला असून यामुळे महापालिकेच्या तिजोरीत महिनाभरात ४० कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे.

ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो. या कराची जास्तीत जास्त वसुली व्हावी यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी एप्रिल महिन्यापासूनच कराची देयके वाटप करण्यास सुरुवात होते. मात्र, मार्च महिन्यापासून करोनाच्या टाळेबंदीमुळे  मालमत्ता कराची देयके नागरिकांना वाटप करण्यात आलेली नाहीत. तसेच गेले चार महिने टाळेबंदीच्या काळात बाजारपेठा, दुकाने आणि उद्योदधंदे बंद असल्याने व्यापाऱ्यांसह नोकरदार वर्गाचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे या कराची वसुली होऊ शकलेली नव्हती.

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी शहरातील बाजारपेठा, दुकाने आणि उद्योदधंदे पुन्हा सुरू झाले असून यामुळे शहरातील अर्थचक्र पुन्हा रुळावर येत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मालमत्ता करवसुलीवर विशेष भर देण्यास सुरुवात केली असून त्यासाठी  कर भरणावर विविध सवलती देऊ केल्या आहेत. त्यास नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागला असून गेल्या महिनाभरात पालिकेने ४० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे.

६७० कोटी संकलनाचे उद्दिष्ट

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १ लाख ८० हजार मालमत्ता असून त्यामध्ये शहरातील गृहसंकुलांचा समावेश आहे. या गृहसंकुलांतील सदनिकाधारकांनी स्वत:च्या नावावर मालमत्ता कराची नोंद केली आहे. त्यामुळे महापालिकेकडून ४ लाख ९३ हजार मालमत्ता कराची देयके तयार करून त्याचे मालमत्ताधारकांना वाटप करण्यात येते. गेल्यावर्षी मालमत्ता करवसुलीसाठी ६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५०२ कोटी रुपये वसूल करण्यात पालिकेला यश आले होते. यंदा ६७० कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:26 am

Web Title: tmc income of rs 40 crore in a month from property tax zws 70
Next Stories
1 कल्याणात करोनाच्या संकेतस्थळावरही गोंधळ
2 ‘मॅक्स लाईफ’कडून ३६ लाखांची जादा वसुली
3 करोना मृतांवर मोफत अंत्यसंस्कार  
Just Now!
X