निविदा प्रक्रिया न राबवता ठाणे महापालिकेचा निर्णय; 

शिवसेना, राष्ट्रवादीच्या निकटवर्तीयांच्या संस्थाकडे ताबा?

High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!
property tax, metro contractors
मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर, मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस

ठाणे शहरातील मैदाने बिल्डरांना विनानिविदा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रशासनाचा निर्णय यापूर्वीच वादग्रस्त ठरला असताना ठाण्यातील शहीद तुकाराम ओंबळे क्रीडा संकुल आणि मुंब्र्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम अशाच पद्धतीने कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता खासगी संस्थांना भाडेपट्टय़ावर देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव तयार करताना महापालिका प्रशासनाने सत्ताधारी शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे हितसंबंध जोपासले आहेत, असा आरोप ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केला असून याप्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.

ठाणे शहरातील मैदाने विकासकांना भाडेपट्टय़ाने देण्याचा प्रस्ताव मध्यंतरी महापालिका प्रशासनाने तयार केला होता. भाईंदर पाडा येथील सुमारे ३६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे विस्तीर्ण मैदान शिवसेना नेत्याच्या कंपनीस भाडेपट्टय़ावर देण्याचा हा वादग्रस्त प्रस्ताव कोणत्याही निविदा प्रक्रियेविना आखण्यात आला होता. याप्रकरणी माध्यमांमधून जोरदार टीका झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेतला खरा; मात्र अशाच पद्धतीचे आणखी दोन प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवत नवा वाद ओढवून घेतला आहे. ठाणे महापालिकेने कौसा येथील तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च करून मोठे क्रीडासंकुल उभारले आहे. या ठिकाणी तरण तलाव, फुटबॉल मैदान तसेच विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. हे स्टेडियम स्वत चालविण्याऐवजी खासगी संस्थेला भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव मध्यंतरी महापालिकेने तयार केला होता. याशिवाय महापालिकेने ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या कोरम मॉल शेजारील महापालिकेच्या मालकीचे असलेले ओंबळे क्रीडा संकुलही भाडय़ाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. ‘मागणी केलेल्या संस्थाच योग्य आहेत आणि इतर कुणाला संधीही द्यायची नाही हा प्रकार धक्कादायक असून सत्ताधारी आणि विरोधकांनी हातमिळवणी करत प्रशासकीय प्रमुखांना यासाठी भरीस पाडले आहे,’ असा आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केला. या निर्णयांना स्थगिती न दिल्यास याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही होऊ शकला नाही.

नियमांना हरताळ

* मुंब्रा स्टेडियम तसेच शहीद तुकाराम ओंबळे क्रीडा संकुल  स्वत: चालवणे शक्य नसल्याने भाडेपट्टय़ावर देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही.

* ठाण्यातील शहीद तुकाराम ओंबळे संकुल गेल्या तीन वर्षांपासून मेसर्स येन बॅडमिंटन अकॅडमीतर्फे चालविले जाते. अकॅडमी आणि पालिकेतला करार नुकताच संपुष्टात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी निविदा मागवून नव्या संस्थेची नेमणूक करावी असे अपेक्षित होते. असे असताना त्याच संस्थेला पुन्हा तीन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रशिक्षण शुल्कातील ३० टक्के रक्कम घेत या संस्थेला ही जागा बहाल करण्यात आली आहे.

* मुंब्र्यातील स्टेडियम भाडेपट्टय़ावर देतानाही निविदा प्रक्रियेला बगल देण्यात आली असून फिनिक्स स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी या संस्थेला सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हे स्टेडियम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.