भिवंडीत जाणाऱ्या नोकरदारांना दिलासा

लोकसत्ता प्रतिनिधी

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

ठाणे : भिवंडी शहरातील उद्योगधंद्यांमध्ये काम करणाऱ्या ठाण्यातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे परिवहन उपक्रमाने मुंब्रा ते भिवंडी या मार्गावर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आज, शुक्रवारपासून ही बससेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. यामुळे ठाण्यातून दररोज भिवंडीत जाणाऱ्या नोकरदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

भिवंडी शहरात मोठय़ा प्रमाणात गोदामे आणि यंत्रमाग कारखाने आहेत. या ठिकाणी ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरांतील अनेक जण काम करतात. त्यांची संख्या मोठी आहे. तसेच भिवंडीतून ठाणे, कळवा, मुंब्रा शहरांत कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी ठाणे परिवहन उपक्रमाने ठाणे ते नारपोली या मार्गावर बससेवा सुरू केली. असे असले तरी मुंब्रा परिसरातून अशी बससेवा सुरू झाली नव्हती. मुंब्रा ते भिवंडी अशी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. विरोधी पक्षनेते शानू अशरफ पठाण, परिवहन समिती सदस्य शमीम खान आणि बालाजी काकडे यांनीही मागणी केली होती. शुक्रवारपासून मुंब्रा ते भिवंडी या मार्गावर बससेवा सुरू झाली आहे, अशी माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी दिली. या मार्गावर दररोज २० बसफेऱ्या होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

बसफेऱ्यांच्या वेळा

मुंब्रा पोलीस ठाणे ते भिवंडीतील शिवाजी चौक अशा बसफेऱ्या होणार आहेत. सकाळी ७ वाजता ही बससेवा सुरू होईल. त्यानंतर ७.३०, ८, ८.३०, ९, १०, १०.४०, ११.१०, ११.४०, दुपारी १२.१०, २.५०, ३.२०, ३.५०, सायंकाळी ४.२०, ४.५०, ६, ६.३०, रात्री ७, ७.३०, ८.००

शिवाजी चौक ते मुंब्रा पोलीस ठाणे

सकाळी ८.२०, ८.५०, ९.२०, ९.५०, १०.२०, ११.३०, दुपारी १२, १२.३०, १, १.३०, सायंकाळी ४.१०, ४.४०, ५.४०, ६.१०, रात्री ७.२०, ७.५०, ८.२०, ८.५०, ९.२०.