News Flash

टीएमटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा निर्णय आठ दिवसांत

दहा वर्षांपासून थकित असलेली देणी मिळवण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी सामुदायिक सुटी घेऊन आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या...

| August 19, 2015 12:39 pm

दहा वर्षांपासून थकित असलेली देणी मिळवण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी सामुदायिक सुटी घेऊन आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांशी महापौर संजय मोरे यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार येईल, असे आश्वासही त्यांनी यावेळी दिले. परिवहन कर्मचाऱ्यांच्या एकूण देणींची माहिती आठ दिवसांमध्ये प्रशासनाने सादर करावी, असा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला असून त्यानंतर २५ ऑगस्टपर्यंत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे विविध भत्ते आणि सवलतीच्या रूपातील लाखो रुपयांची रक्कम गेल्या दहा वर्षांपासून थकित आहे. प्रवासी भत्ते, वैद्यकीय सवलत अशासाठीची रक्कम कर्मचाऱ्यांना अद्याप मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे निराश कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्टचा मुहूर्त साधत सामुदायिक सुटी घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. १५ ऑगस्टला पहाटे आंदोलनाला सुरुवात झाली. मात्र प्रभारी परिवहन महाव्यवस्थापक संदीप माळवी यांच्या मध्यस्थीने महापौर आणि पालिका आयुक्तांशी चर्चा करून हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. यावेळी महापौरांनी बैठकीचे अश्वासन यावेळी कार्मचाऱ्यांना दिले होते. या संदर्भातील बैठक नुकतीच महापौर संजय मोरे यांच्या दालनामध्ये पार पडली.
या बैठकीस स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेते हणमंत जगदाळे, भाजपा गटनेते संजय वाघुले, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, प्रभारी परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी, तसेच ठाणे महापालिका परिवहन उपक्रम कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील कामगार संघटनांनी कामगारांच्या मागण्या बैठकित मांडल्या. कर्मचाऱ्यांचे थकीत भत्ते व त्यांच्या मागण्या यांची सविस्तर माहिती आठ दिवसात सादर करण्याचे आदेश यावेळी महापौर संजय मोरे यांनी टीएमटी प्रशासनाला दिले.
या मागण्या लक्षात घेऊन त्यावर निश्चितच तोडगा काढता येईल, असे सांगत २५ ऑगस्टला पुन्हा बैठक घेऊन यावर विचारविनिमय करूनच मार्ग काढला जाईल, असे अश्वासन महापौर संजय मोरे यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 12:39 pm

Web Title: tmt decision arrears of the employees in eight days
टॅग : Arrears
Next Stories
1 एपिलेप्सी रुग्णांना ‘उत्तेजन’
2 सार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांचे हाल
3 २७ गावांमधील वातावरण तापले
Just Now!
X