20 January 2018

News Flash

ठाण्यात ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो गोविंदा’; संस्कृती युवा प्रतिष्ठान खेळवणार सामने

वर्तकनगर परिसरात होणार उत्सव

ठाणे | Updated: August 13, 2017 5:49 PM

प्रो कबड्डी सामन्याचे संग्रहित छायाचित्र

ठाण्यातील दहिकाला उत्सवाच स्वरूप बदलत असतानाच ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावतीने संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘प्रो गोविंदां’च्या कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात काही खेळाडूदेखील सहभागी होणार आहेत.

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात होणाऱ्या या उत्सवात ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो गोविंदा’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या उत्सवानिमित्त मैदानाला स्टेडिअमचे स्वरूप देण्यात येणार आहे. तसेच या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना आकर्षक बक्षीसे देखील मिळणार आहेत.

या ठिकाणी हंडीच्या वातावरणात ‘प्रो कब्बडी’च्या धर्तीवर ३५०० हुन अधिक व्यक्तींना बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले असल्याची माहिती देखील सरनाईक यांनी दिली आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या नियमांना अधीन राहून तसेच राज्य शासनाच्या क्रीडा खात्याच्या धोरणानुरसर साजरा केला जाणार आहे.

First Published on August 13, 2017 5:48 pm

Web Title: to celebrate pro govinda on the lines of pro kabaddi in thane
  1. No Comments.