लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली : रेल्वे स्थानक भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दुतर्फा चारचाकी वाहने उभी करण्यात येत असून यांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. काही रस्त्यांवर बंद अवस्थेतील भंगार वाहने अनेक वर्षांपासून धूळ खात उभी असल्याने कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे इंधन आणि वेळ वाया जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत

डोंबिवली पूर्वेतील पी. पी. चेम्बर्स व्यापारी संकुलासमोरील रस्त्यावर वाहने उभी करण्यास वाहतूक पोलिसांनी मनाई केली आहे. तरीही सकाळ आणि सायंकाळी येथे अनेक जण वाहने उभी करून बाजारात खरेदीसाठी जातात. महापालिका डोंबिवली विभागीय कार्यालय आणि पी. पी. चेम्बर्स मॉल यांच्यामध्ये वळण रस्ता आहे. येथून केडीएमटी, खासगी बसची वाहतूक सुरू असते. या बसगाडय़ांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमुळे वळण घेणे शक्य होत नाही. परिणामी बसच्या मागे वाहनांच्या रांगा लागून कोंडी होते. याच भागात रस्त्याच्या एका कोपऱ्यावर रिक्षाचालक उभे असतात. त्यामुळे या अरुंद भागातून केडीएमटी, खासगी बस चालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. अशीच परिस्थिती नेहरू रस्त्यावर आहे. मानपाडा रस्त्याने येणारी बहुतांशी वाहने फडके रस्त्याला ओलांडून नेहरू रस्त्याने ठाकुर्ली पुलाकडे जातात. त्यामुळे नेहरू रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावरून रिक्षा, खासगी वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यात या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले बसलेले असतात. फडके रस्त्यावरून एचडीएफसी बँक, त्यापुढील दोन गल्ल्यांमधून वाहनांची नेहरू रस्त्यावर वाहतूक सुरू असते. ही सर्व वाहने रेल्वे स्थानकाकडे जाणारी किंवा ठाकुर्ली उड्डाणपूल, गणेश मंदिराकडे जाणारी असतात. एका मोटार वाहन प्रशिक्षण देणाऱ्या केंद्राची वाहने याच रस्त्यावर उभी असतात. नेहरू रस्त्यावर अनेक वर्षे बंद अवस्थेतील वाहने धूळ खात उभी आहेत. पालिका व वाहतूक विभागाने ही वाहने उचलून नेण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

दंडात्मक कारवाई

याबाबत एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, रस्त्याच्या कडेला नियमबाह्य़ उभी करण्यात आलेली वाहने आता नवीन नियमाप्रमाणे टोइंग व्हॅनने उचलण्यात येत नाहीत किंवा त्यांना जॅमर लावण्यात येत नसला तरी या वाहनांचा क्रमांक मोबाइलमध्ये घेऊन त्यांना ऑनलाइन दंड पावती पाठविण्यात येते. दररोज सुमारे ७० ते ८० दुचाकी आणि २५ ते ३५ चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते.