28 February 2021

News Flash

मनसेच्या मोर्चामुळे आज ठाण्यात वाहतूक बदल 

ह्य़ुंदाई शोरूम येथील तीन हात नाका सेवा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात सोमवारी ठाण्यात महामोर्चा काढला जाणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेतर्फे  सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.

ह्य़ुंदाई शोरूम येथील तीन हात नाका सेवा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तीन हात नाका सेवा रस्त्यावरून तीन हात नाका आणि नितीन जंक्शनच्या दिशेने जाण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. या मार्गावरील वाहने ठाणे महापालिका मुख्यालयावरून नितीन जंक्शनमार्गे पुढे सोडण्यात येतील. मोर्चा तीन हात नाका येथून हरिनिवास चौकाच्या दिशेने जाताना तीन हात नाका येथून हरिनिवासच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. या मार्गावरील वाहने मल्हार सिनेमा चौक, नितीन जंक्शन किंवा कोपरी पूल येथून पुढे जातील. तीन पेट्रोल पंपकडे जाणारी सर्व वाहतूक वंदना टी पाइंट तसेच राम मारुती रोड येथून गजानन चौकाच्या दिशेने जाणारी वाहतूक पु.ना.गाडगीळ चौकात बंद केली जाईल. श्रद्धा वडापावकडून तीन पेट्रोल पंपाच्या दिशेने जाणारी वाहतूक श्रद्धा वडापाव येथे आणि खंडू रांगणेकर चौकातून गजानन चौकाच्या दिशेने येणारी वाहतूक खंडु रांगणेकर चौकात बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग असणाऱ्या वंदना टी पाइंट येथून गजानन चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक वंदना टी पाइंट-तीन पेट्रोल पंपमार्गे पुढे सोडण्यात येणार आहे. राम मारुती रोडवरील गजानन चौकाकडे जाणारी वाहतूक पु.ना. गाडगीळ चौकातून हॉटेल ग्रीन लिफ येथून डॉ. मुस चौकाकडे, श्रद्धा वडापावमार्गे पुढे तीन पेट्रोल पंपाच्या दिशेने जाणारी वाहतूक श्रद्धा वडापाव-गणपती कारखान्याकडून आराधना क्रॉसमार्गे आणि खंडू रांगणेकर चौकातून गजानन चौकाकडे जाणारी वाहतूक रांगणेकर चौकातून पुढे अल्मेडा जंक्शन -वंदना टी पॉइंट किंवा महापालिका मुख्यालय चौक येथून पुढे सोडण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 12:39 am

Web Title: traffic jam mns
Next Stories
1 सहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम
2 १०४ वर्षे जुन्या पत्रीपुलाच्या पाडकामाला सुरुवात, सोमवारी सकाळपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी
3 कल्याणचा पत्रीपूल आज तोडणार
Just Now!
X