21 February 2020

News Flash

मुंब्र्यात तरुणांचा वर्दीवर हात, वाहतूक पोलिसांचे कपडे फाडले; भररस्त्यात केली मारहाण

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

मुंब्र्यात तरुणांनी पोलिसांवर हात उचलला असल्याची घटना समोर आली आहे. तरुणांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना भररस्त्यात मारहाण केली. तरुण पोलीस कर्मचाऱ्यांवर अक्षरश: तुटून पडले होते. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कपडेही फाडले. काही जणांनी तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक कारवाई सुरु होती. यावेळी काही तरुण आणि एका महिलेने जबरदस्त राडा केला. मुंब्रा कन्व्हर नगर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांच्या कारवाईदरम्यान काही दुचाकीस्वारांना पकडलं होतं. यावेळी त्यांनी थेट राडा करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी वाहतूक परवाना ताब्यात घेतल्याने तरुणांनी जाब विचारत वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. रस्त्याच्या बाजूलाच हा प्रकार सुरु असल्याने लोकांची मोठा गर्दी झाली होती. तरुणांची पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली होती. अंगद मुंडे, प्रशांत गोसावी, दिनेश राऊत व विनायक वाघमारे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

गर्दीचा फायदा घेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाइलदेखील चोरण्यात आला. पोलिसांनी अफनान कुरेशी, शमसुद्दीन अहमद बांगी, तमसील अफाक कुरेशी व फैजान शेख या चौघांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आलं आहे. एकजण फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

First Published on August 20, 2019 6:58 pm

Web Title: traffic police constables attacked in mumbra sgy 87
Next Stories
1 औद्योगिक वसाहतींमध्ये घरे
2 नारळाचा पदार्थ बनवा आणि आकर्षक बक्षिसे जिंका!
3 शिवसेनेचा भगवा कथोरेंच्या खांद्यावर
Just Now!
X