तज्ज्ञांची मदत घेण्याचा वाहतूक पोलिसांचा निर्णय

ठाणे पूर्व ते कासारवडवली मार्गावर बेकायदा धावणाऱ्या खासगी बसगाडय़ांना कोपरी भागात प्रवेश बंद करण्याच्या निर्णयापाठोपाठ आता या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मुंबईतील वाहतूकतज्ज्ञ डॉ. विश्वनाथन यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरी परिसरातील वाहतुकीचे नियोजन कसे असावे, यासंबंधीचा सविस्तर अभ्यास या माध्यमातून केला जाणार असून त्यानुसार नव्याने नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी दिली.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

ठाणे पूर्व रेल्वे स्थानक तसेच अंतर्गत भागातील रस्ते अरुंद असून त्यापैकी बहुतांश रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. काही वर्षांपासून कोपरी भागात कंपन्यांच्या बसगाडय़ांचा भार वाढला असून यामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या कोंडीमध्ये ठाणे पूर्व ते कासारवडवली या मार्गावर बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ांमुळे भर पडत आहे. या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेले कोपरीकर बसगाडय़ांविरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. या आंदोलनानंतर कोपरी भागात खासगी बसगाडय़ांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी तूर्तास घेतला असला तरी आधीचा अनुभव लक्षात घेता येथील रहिवाशांच्या मनात अजूनही धास्ती कायम आहे. रहिवाशांच्या सततच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी कंपन्यांच्या बसगाडय़ांचे थांबे इतरत्र हलविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

दूरगामी योजनांची नांदी

रेल्वे स्थानकालगत असलेल्या कोपरी भागात खासगी व कंपन्यांच्या बसगाडय़ांव्यतिरिक्त अन्य वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. या वाहतुकीमुळेही कोपरी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांनी आता कोपरी परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी दूरगामी योजनांवर काम सुरू केले आहे. त्यासाठी मुंबईतील वाहतूकतज्ज्ञ डॉ. विश्वनाथन यांची मदत घेण्यात येणार आहे. कोपरी भागातील विविध रस्त्यांचा आणि त्या भागातील वाहतुकीचा सविस्तर अभ्यास करून अहवाल तयार करणार आहेत. त्यामध्ये कोपरी भागातील वाहतूक व्यवस्था कशी असावी, यासंबंधीचा नवा आराखडा असणार आहे. या आराखडय़ाद्वारे वाहतूक पोलीस या भागातील वाहतुकीचे पुनर्नियोजन करणार आहेत.

कोपरी परिसरातील रस्ते आणि वाहतुकीचा अभ्यास करून या भागातील वाहतूक व्यवस्था नेमकी कशी असावी यासंबंधीचे मार्गदर्शन वाहतूकतज्ज्ञ विश्वनाथन यांच्याकडून घेण्यात येणार आहे. कोणत्या मार्गावरील वाहतूक एकेरी किंवा वर्तुळाकार करायची याचा अहवाल ते देणार असून त्याआधारे वाहतुकीचे पुनर्नियोजन करण्यात येईल.

आशुतोष डुम्बरे, ठाणे सहपोलीस आयुक्त