ठाणे : दुचाकी चालवताना भर रस्त्यात अचानक चक्कर येऊन पडून डोक्याला रक्तस्राव झालेल्या एका २० वर्षीय मुलीचे प्राण ठाणे वाहतूक पोलिसांमुळे बचावले. या तरुणीला वाहतूक पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
कळवा येथे राहणारी शीतल मंदोकिया ही रविवारी तिच्या दुचाकीने कोर्टनाका येथून कळव्याच्या दिशेने जात होती. मात्र, त्यावेळी तिला अचानक चक्कर आली आणि ती दुचाकीवरून खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. दरम्यान, याच भागात ठाणेनगर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक दिलीप मरळीकर हे कर्तव्यावर असताना त्यांनी शीतलच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर धुमाळ आणि मरळीकर यांनी एका खासगी कारने शीतलला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शीतलवर प्राथमिक उपचार करून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2019 3:41 am